सहका-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या ‘त्या’ पोलिसाची कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:08 IST2017-09-18T06:08:44+5:302017-09-18T06:08:58+5:30

सहका-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या पोलिसाची शिवाजीनगर पोलीस कसून चौकशी करत आहेत़ नेमके काय घडले आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत़ या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक दाखविण्यात आलेली नाही़

A thorough investigation of 'those' policemen who raped his wife | सहका-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या ‘त्या’ पोलिसाची कसून चौकशी

सहका-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या ‘त्या’ पोलिसाची कसून चौकशी

अंबरनाथ : सहका-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या पोलिसाची शिवाजीनगर पोलीस कसून चौकशी करत आहेत़ नेमके काय घडले आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत़ या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक दाखविण्यात आलेली नाही़
आरोपी योगीराज वाघ हा ठाणे ग्रामीण पोलिसांच्या भिवंडी विभागात कार्यरत आहे. त्याने आपल्या सहकारी मित्राच्या पत्नीवरच बलात्कार केला. योगीराजचे पीडित महिलेच्या घरी येणे-जाणे होते. त्याचा फायदा घेत वाघ याने त्या महिलेला धमकावले होते. पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत, त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितल्यावर, वाघ याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाघ याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, तपासाचा भाग असल्याने त्याला अजूनही अधिकृतपणे अटक दाखविण्यात आलेली नाही.
वाघ हा पोलीस असल्याने हे प्रकरण शिवाजीनगर पोलीस दक्षतेने हाताळत आहेत. आरोपी ताब्यात असतानाही त्याला अजून अटक का केली नाही, याबाबत योग्य खुलासा झालेला नाही. पोलीस योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे.

Web Title: A thorough investigation of 'those' policemen who raped his wife