शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काटेरी जाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 3:22 AM

कोंडेश्वरला पर्यटकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. जे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून कुंडात उडी मारतात, त्यांना आळा घालण्यासाठी काटेरी कुंपण घालण्यात आले आहे.

- पंकज पाटीलबदलापूर  - कोंडेश्वरला पर्यटकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. जे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून कुंडात उडी मारतात, त्यांना आळा घालण्यासाठी काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता वाहत्या पाण्याखालीच भिजण्याचा आनंद घेता येणार आहे.मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागांतील असंख्य पर्यटक धबधब्यावर भिजण्यासाठी कोंडेश्वरला येतात. निसर्गरम्य वातावरण आणि हिरव्यागार वनराईसोबत धबधब्याचा आनंद घेणे पर्यटक पसंत करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत कोंडेश्वर धबधब्यावर दारू पिऊन कुंडात उडी मारणाऱ्या अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन वर्षांपासून या कुंडाभोवती काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. ही उपाययोजना केल्यापासून पर्यटकांचे जीव मोठ्या प्रमाणात वाचले होते. पावसाळा संपल्यावर या तारेचे कुंपण तोडण्यात येते. मात्र, यंदा पुन्हा तारेचे कुंपण घालत पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. सुरुवातीला तार तुटल्याने यंदा पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही तार पुन्हा बसवण्यात आल्याने पर्यटकांना उंचावरून उड्या मारणे शक्य होणार नसल्याचे पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने कोंडेश्वर धबधब्याने धोक्याची पातळी गाठली होती. मात्र, पुन्हा पाऊस कमी होताच पर्यटकांची गर्दी धबधब्यावर वाढली आहे. या वाढलेल्या गर्दीवर देखरेख करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे. मात्र, शनिवारच्या मुसळधार पावसात मात्र धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. मात्र, रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांची गर्दी वाढली होती. या ठिकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून काही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना पोलीसमित्र म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. हे पोलीसमित्र पर्यटक आणि त्यांच्या सुरक्षेवर देखरेख करणार आहेत.कोंडेश्वरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणकोंडेश्वर धबधब्यावर भिजण्यासाठी शेकडो पर्यटक येत असल्याने बदलापूर-खरवई ते कोंडेश्वर हा रस्ता पूर्ण खचला होता. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी एमएमआरडीएकडे दिला होता. त्यानुसार, संपूर्ण ग्रामीण भागातील कोंडेश्वर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. या रस्त्यामुळे पर्यटकांना सहज धबधब्याच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होत आहे.भोज धरणावरही पर्यटकांची गर्दीअंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वरला लागूनच असलेल्या भोज धरणावरही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कोंडेश्वर धबधब्यातून वाहणारे पाणी हे थेट भोज धरणात जाते. त्यामुळे भोज धरण भरल्यावर त्याच्या बंधाºयावरून वाहणाºया पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात. भोज धरण भरून वाहू लागल्याने आता या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी वाढत आहे.ग्रामस्थ करतात पर्यटकांची लूटकोंडेश्वर धबधब्यावर जाण्यासाठी येणाºया प्रत्येक दुचाकीस्वाराकडून १० रुपये आणि चारचाकी चालकांकडून २० रुपये घेतले जात आहेत. हे पैसे वसूल करण्याबाबत रीतसर कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नसताना काही तरुण मर्जीप्रमाणे पावती फाडत असल्याने त्यांच्यावर योग्य ते निर्बंध घालण्याची मागणी पर्यटक करत आहेत. हे पैसे नेमके कुणाच्या परवानगीने वसूल केले जात आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, ही पावती पर्यटकांसाठी ऐच्छिक करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरKondeshwarकोंडेश्वर