एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले

By अनिकेत घमंडी | Updated: February 28, 2024 10:11 IST2024-02-28T10:11:34+5:302024-02-28T10:11:46+5:30

एमआयडीसी निवासी भागात सद्या चोरट्या पाच महिला पहाटे येऊन चोऱ्या करीत असल्याचे दिसत आहे.

Thieving women's gang rampage in MIDC residential area, residents panic | एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले

एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले

डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात सद्या चोरट्या पाच महिला पहाटे येऊन चोऱ्या करीत असल्याचे दिसत आहे. सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी, सोमवारी पहाटे सव्वाचार ते साडेचार दरम्यान या अट्टल चोरट्या महिला गँगने निवासी भागातील कामत हॉस्पिटल ( प्लॉट P-69 ) मधील आवारात ठेवलेले अडीच बाय साडेसहा फुटाचे सात अल्युमिनियम/फायबर बनावटीचे किंमती दरवाजे हे चोरून नेले.

 हा सर्व प्रकार ही सीसी कॅमेऱ्यात बघितली असता पाच महिलांची गँग हे दरवाजे चोरताना त्यांची छबी कॅमेरात कैद झाल्याचे पाहण्यास मिळाले असून गेले काही दिवस निवासी भागात अशा अनेक प्रकारांचा चोऱ्यात यांचा हात असल्याचे माहिती पडत आहे. या महिला मोठे कापडी पोते घेऊन भंगार गोळा करीत असल्याचे दाखवून चोऱ्या करीत आहेत. याबाबत कामत हॉस्पिटलने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून लवकरच सदर या चोरट्या महिलांना पकडण्यात येईल असे सांगण्यात आल्याची माहिती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी दिली.

Web Title: Thieving women's gang rampage in MIDC residential area, residents panic