शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

विविध स्थानकांत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:46 PM

लोहमार्ग पोलिसांची माहिती; मे अखेरपर्यंत दीड हजार मोबाइलची चोरी

ठाणे : मध्य आणि पश्चिम या रेल्वेमार्गांवरील ठाणे, कल्याण व कुर्ला तसेच अंधेरी आणि बोरीवली या रेल्वेस्थानकांच्या हद्दीत मोबाइलचोरीचे प्रकार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ या वर्षभरात अंदाजे चार हजार दोनशे, तर २०१९ च्या मे अखेरपर्यंत सुमारे दीड हजार मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दिली.दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे होणाऱ्या गर्दीत मोबाइलचोरीचे प्रकार वाढले आहेत. लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दररोज सरासरी ६५ ते ७० मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. तसेच पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणाºया चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ८० टक्के गुन्हे हे मोबाइलचोरीचे, तर २० टक्के गुन्हे हे इतर वस्तूंच्या चोरीचे असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यातच, मोबाइलचोरीचे प्रकार प्रामुख्याने गर्दी असणाºया सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत घडत आहेत. मोबाइल चोरट्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुष चोरट्यांचे प्रमाण अधिक आहे. २०१८ या वर्षभरात रेल्वेतून मोबाइल चोरणाºया चार हजार १६२, तर २०१९ च्या मे अखेरपर्यंत एक हजार ४५२ चोरटे जेरबंद झाल्याची माहिती लोहमार्ग शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिली.प्रवाशांमध्ये जनजागृतीमोबाइल चोरट्यांवर आळा बसण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवाशांनी मोबाइल व सामानाची काळजी घेण्याबाबत उद्घोषणा केली जाते. रेझिंग डे सप्ताहानिमित्त व रेल्वे प्रवासी संघटनांसोबत बैठकांचे आयोजन करून प्रवासांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतात.