बाजारपेठेतील दुकानात चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST2021-08-14T04:45:00+5:302021-08-14T04:45:00+5:30
ठाणे : महागिरी बाजारपेठेतील रॉयल ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या जाफर शेख (वय ५४, रा. ...

बाजारपेठेतील दुकानात चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा अटकेत
ठाणे : महागिरी बाजारपेठेतील रॉयल ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या जाफर शेख (वय ५४, रा. नागपाडा, मुंबई) या चोरट्याला ठाणेनगर पोलिसांनी गुरुवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास रंगेहात अटक केली. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली सामग्रीही जप्त केली आहे.
ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील महागिरीमधील कारखानी या इमारतीखाली असलेल्या रॉयल ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानाचे शटर स्क्रू ड्रायव्हर आणि कटावणीच्या साहाय्याने कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करीत असताना गस्तीवरील पोलिसांनी त्यांना पकडले. त्याला पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेला स्क्रू ड्रायव्हर आणि कटावणीही जप्त केली आहे. त्याच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विक्रम शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.