आग विझवायला गेले; पण पाण्याविना, स्थायी समितीत झाले उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 02:16 AM2019-08-17T02:16:45+5:302019-08-17T02:16:57+5:30

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती.

They go to Extinguished fire but without water | आग विझवायला गेले; पण पाण्याविना, स्थायी समितीत झाले उघड

आग विझवायला गेले; पण पाण्याविना, स्थायी समितीत झाले उघड

Next

ठाणे : महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती. ती विझवण्यासाठी गेलेल्या टँकरमध्ये पाणीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. परंतु, असे असतानाही अग्निशमन विभागाने तयार केलेल्या अहवालात त्यावेळेस पाइपमध्ये पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

स्थायी समितीची बैठक सुरू होताच म्हस्के यांनी या मुद्याला हात घातला. महिनाभरापूर्वी महापालिकेच्या बाजूला असलेल्या एका कार्यालयात आग लागली होती. त्यावेळेस प्रत्यक्ष ठिकाणी मी हजर होतो, त्यावेळेस अग्निशमन विभागाची एक गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळेस कर्मचारी पहिल्या मजल्यापर्यंत पाइप घेऊन गेले आणि तो सुरूकेला असता त्यात पाणीच नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली, असे म्हस्के म्हणाले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एखाद्या टँकरमध्ये पाणी नाही, याची कल्पना अग्निशमन विभागाला नव्हती का, असा सवालही त्यांनी केला. त्यावेळेस अग्निशमन केंद्र जवळ असल्याने दुसरी गाडी मागवून ती आग विझवण्यात आली. मात्र, एखाद्या लांबच्या ठिकाणी अशी घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोणाला ठरवले असते, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

तसा अहवालच तयार केलेला नाही : काळे

विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने याविषयी जो अहवाल तयार केला आहे, त्यामध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा पाठवलेल्या टँकरमध्ये पाणी होते, असा हवाला दिला आहे. त्यामुळे अग्निशमन विभाग केवळ आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करीत असून ज्या कोणी अधिकाºयाने ती केली, त्याच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली. परंतु, तसा अहवाल तयार केला नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली. तसेच ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळेस पहिल्या टँकरमध्ये पाणी नसल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला. अखेर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर
कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्याने या वादावर पडदा पडला.

Web Title: They go to Extinguished fire but without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.