यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई

By सुरेश लोखंडे | Published: February 29, 2024 08:32 PM2024-02-29T20:32:34+5:302024-02-29T20:32:39+5:30

जिल्ह्यातील या सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मे. टन चारा उत्पादित होणार आहे.

There will be an adverse effect on the rains this year Ban on transportation of animal fodder to other districts | यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई

यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे  देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यास विचारात घेता ठाणे जिल्ह्यात पुढील कालावधीत जनावरांसाठी चाऱ्यायाची टंचाई परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी २०२३-२४ या वर्षातील खरीप पिक पेरणी, रब्बी पिक पेरणी, जंगल वनक्षेत्र, चराऊ क्षेत्र, झाडपाल, बांधावरील गवत आदी जनावरांच्या चार्याची अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यास  मनाई आदेश ठाणे जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे  यांनी जारी केला आहे. 

जिल्ह्यातील या सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मे. टन चारा उत्पादित होणार आहे. जिल्ह्यातील पशुधनास माहे जून-२०२४ पर्यंत एक लाख १९ हजार मे. टन चारा आवश्यक आहे. जिल्ह्यातील पशुधनास पाऊस उशिरा आल्यास जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई भासू शकते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारा चारा तसेच मुरघास इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणणे व जिल्ह्या बाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये, यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही. यासाठी अन्य जिल्ह्यांत चारा वाहतूक करण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.   

जेणेकरून ठाणे जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी खात्री झाल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता,  नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून ठाणे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई असल्याबाबत ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांनी आदेश दिले आहेत. हा आदेश निर्गमित झाल्यापासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Web Title: There will be an adverse effect on the rains this year Ban on transportation of animal fodder to other districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.