शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

दिव्यातील ३२५ कुटुंबे येणार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:49 AM

खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते.

ठाणे : खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, शनिवारी सुटीच्या दिवशी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये दिव्यात कारवाई केली. सुरुवातीला नागरिकांनी या कारवाईस विरोध केला. मात्र, अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून त्या पाच इमारती, चाळी अशा तब्बल ३२५ कुटुंबांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला. तसेच या इमारती आणि चाळींना जाणाऱ्या जलवाहिन्या काढल्या असून पंपही जप्त केले आहेत. आता या इमारतींवर मंगळवारनंतर हातोडा टाकण्यात येणार आहे.मुंब्य्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते इराकी आरीफ नवाज यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी होऊन दिवा आणि मुंब्य्रातील अशा प्रकारे खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे आदेश पालिकेला दिले होते.त्यानुसार, शनिवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १८० पोलीस बंदोबस्तासह महापालिकेचे १२ अधिकारी आणि इतर पथके दिव्यात दाखल झाली. परंतु, या सर्वांना दिव्यात शिरण्यापासून संतप्त रहिवाशांनी रेल्वेफाटकाजवळच रोखले होते. त्यामुळे काही काळ वादंग निर्माण झाला होता. तो दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे अशांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपायुक्त जोशी यांनी दिली.काही काळानंतर संतप्त जमावातून मार्ग काढून पालिकेचे पथक दिव्यातील त्या पाच इमारतींच्या ठिकाणी पोहोचले़ यावेळी या पथकामार्फत या इमारतींसह खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या चाळीचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला़ या ठिकाणी ३२५ कुटुंबांचे वास्तव्य असल्याची माहिती पालिकेने दिली.>मंगळवारनंतर बांधकामांवर पडणार हातोडाठाणे महापालिकेच्या माध्यमातून अचानकपणे शनिवारी ही कारवाई झाल्याने मोठ्या कष्टाने हक्काचे घर घेणाऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. तर, एका स्थानिकाच्या बंगल्याचेही पाणी, वीज कनेक्शन खंडित केले आहे. दरम्यान, आता येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.