कल्याण-डोंबिवली, तळोजा येथे आज पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST2021-03-19T04:40:02+5:302021-03-19T04:40:02+5:30

डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी गुरुत्व वाहिनीची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले ...

There is no water in Kalyan-Dombivali, Taloja today | कल्याण-डोंबिवली, तळोजा येथे आज पाणी नाही

कल्याण-डोंबिवली, तळोजा येथे आज पाणी नाही

डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी गुरुत्व वाहिनीची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी २४ तासांचा कालावधी लागणार असल्याने गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारपासून पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी सांगितले.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महापालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना जांभूळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा हा २४ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी मुबलक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--------------------------

Web Title: There is no water in Kalyan-Dombivali, Taloja today