कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST2021-09-05T04:46:16+5:302021-09-05T04:46:16+5:30

कल्याण : राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी दिली ...

There is no funding for the development of Kalyan West | कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधी नाही

कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधी नाही

कल्याण : राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी दिली होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधीच मिळालेला नाही. भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यात हाच फरक आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे.

पश्चिमेतील गांधारी परिसरातील उद्यानाचा विकास माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून करण्यात आला होता. या उद्यानाचे लोकार्पण शनिवारी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वरील टीका केली. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, प्रेमनाथ भोईर, वरुण पाटील, मोरेश्वर भोईर, संजय कारभारी आदी उपस्थित होते. पाटील यांनी सांगितेल की, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पात भिवंडी ते कल्याणदरम्यान कामाची निविदाही अद्याप काढलेली नाही.

आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही, असे वक्तव्य केले होते. याविषयी पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, म्हात्रे यांची काय समस्या आहे, हे मी सांगू शकत नाही. मात्र, मोदी सरकारने ११ महिलांना मंत्रिपद दिले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला कधीच मंत्री झाल्या नव्हत्या. तरीही भाजपने महिलांचा सन्मान केला नाही, असे वक्तव्य करणे हे अयोग्य आहे.

ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी थेट बोलावे

महागाईच्या मुद्यावर कल्याणचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. २०१४ मध्ये ज्यांना लोकसभेत निवडून दिले आहे, त्यांची जागा दाखवून द्या. याविषयी कपिल पाटील यांनी सांगितले की, जो ज्या संस्कृतीतून येतो, त्याची तशी भाषा असते. ही पोस्ट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वच खासदारांना लागू होते. ज्यांना आम्हाला बोलायचे आहे. त्यांनी थेट आम्हाला बोलावे, असे आव्हान पाटील यांनी केले आहे.

---------------------------

Web Title: There is no funding for the development of Kalyan West