ठाण्यातील काही भागात पाणी नाही; महापालिकेकडून महत्त्वाचे आवाहन
By अजित मांडके | Updated: February 21, 2024 13:34 IST2024-02-21T13:34:09+5:302024-02-21T13:34:41+5:30
पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

ठाण्यातील काही भागात पाणी नाही; महापालिकेकडून महत्त्वाचे आवाहन
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभागसमितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शळी टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे गुरूवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र.26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभागसमितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच या पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.