"...तर असे पुस्तक काढण्याची वेळ आली नसती", एकनाथ शिंदेचा संजय राऊंताना टोला
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 17, 2025 17:48 IST2025-05-17T17:47:38+5:302025-05-17T17:48:08+5:30
Eknath Shinde News: नरकातला स्वर्ग लिहिणाऱ्यांनी ज्येष्ठ गिर्यारोहक, लेखक शरद कुललकर्णी यांचे मार्गदर्शन घ्यावे. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर असे पुस्तक काढायची वेळी आली नसती असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना लगावला.

"...तर असे पुस्तक काढण्याची वेळ आली नसती", एकनाथ शिंदेचा संजय राऊंताना टोला
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - नरकातला स्वर्ग लिहिणाऱ्यांनी ज्येष्ठ गिर्यारोहक, लेखक शरद कुललकर्णी यांचे मार्गदर्शन घ्यावे. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर असे पुस्तक काढायची वेळी आली नसती असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना लगावला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करुन पाप झाकता येणार नाही असा टोमणाही शिंदेंनी राऊतांना दिला.
शरद कुलकर्णी लिखित, अमलताश बुक्स प्रकाशित ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. शिंदे म्हणाले की, कुलकर्णी यांचे पुस्तक वाचल्यावर चित्तथरारक अनुभव वाचकांना वाचायला मिळतील. गिर्यारोहण हे केवळ साहस नसून ती जीवनशैली आहे. कुलकर्णी यांच्यासारखे अनेक धाडसी लोक या ठाण्यात राहतात, सासही वृत्ती ठाणेकरांमध्ये आहे. मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो. कुलकर्णी यांच्यातील निर्धार वृत्ती, साहस, लढाऊ वृत्ती याचे मार्गदर्शन तरुणांकडून घेण्याची गरज आहे. यावेळी मनोज शिंदे, रामकृष्ण नेत्रालयाचे डॉ. नितीन देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वक्ते डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले की, या पुस्तकाचा आशय निखाऱ्यासारखा धगधगता आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याचा अनुभव मिळतो. अशा प्रकारचे जगातील एकमेव पुस्तक आहे. कुलकर्णी प्रमाणे की, माझ्यासोबत जो जो प्रसंग घडले तेमी लिहीत गेलो आणि त्यातून पुस्तक सारारले आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळेल.