थीम पार्कच्या चौकशीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:13 AM2020-02-21T02:13:09+5:302020-02-21T02:13:13+5:30

माजी महापौरांचा आरोप : आयुक्तांना केले टार्गेट

The theme park inquiry furs | थीम पार्कच्या चौकशीचा फार्स

थीम पार्कच्या चौकशीचा फार्स

Next

ठाणे : थीम पार्कच्या चौकशीचा अहवाल येऊनही अद्याप केवळ विभागीय चौकशीच्या पलीकडे यासंदर्भात कार्यवाही पुढे सरकलेली नसल्याचे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीच यासंदर्भात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मी महापौर असताना संबंधित ठेकेदारांना दिलेली ही सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीपलीकडे काहीच झाले नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

नगरसेवकांनी विचारलेला प्रश्न संबंधित विभागाला पाठवण्यावरून सर्वसाधारण सभेत सचिव विभाग आणि उद्यान विभागांमध्ये असमन्वय दिसून आला. शिंदे यांनी काही प्रश्न विचारले होते. मात्र, मुख्यालय उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आपल्याला हे प्रश्न महासभेच्या एक दिवस आधी मिळाले असल्याचा खुलासा केला. यावर सचिव अशोक बुरपुल्ले यांनी मात्र तो २० दिवस आधीच संबंधित विभागाकडे पाठवला असल्याचे सांगून यासंदर्भातील नोंदीदेखील सभागृहात दाखवल्या.
यावरून महापालिकेच्या दोन विभागांत समन्वय नसल्याचे दिसून आले.

तर आयुक्तांचा पर्दाफाश केला असता
च्या सर्व वादग्रस्त प्रकल्पावरून मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांनादेखील टार्गेट केले. आयुक्त या सर्वसाधारण सभेत आले असते, तर त्यांचा पर्दाफाश झाला असता म्हणूनच ते आले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
च्ज्यावेळी नगरसेवक प्रश्न विचारात होते, तेव्हा त्यांचा ब्लॅकमेलर असा उल्लेख त्यांच्याकडून व्हायचा. आता या सर्व वादग्रस्त प्रकल्पांचे उत्तर देण्यासाठी ते सभागृहात का उपस्थित राहिले नाहीत, असा प्रश्न करून त्यांनी आयुक्तांवर निशाणा साधला.

Web Title: The theme park inquiry furs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.