डिस्कसह टायरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST2021-03-10T04:39:28+5:302021-03-10T04:39:28+5:30

------------------------------------------ कारचालकाला मारहाण डोंबिवली : वाहन मागे घेण्यावरून झालेल्या वादात कारचालक भगवान काटे यांना रिक्षाचालकासह अन्य एकाने लोखंडी ...

Theft of tires with discs | डिस्कसह टायरची चोरी

डिस्कसह टायरची चोरी

------------------------------------------

कारचालकाला मारहाण

डोंबिवली : वाहन मागे घेण्यावरून झालेल्या वादात कारचालक भगवान काटे यांना रिक्षाचालकासह अन्य एकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री ११.३० वाजता ठाकुर्ली पूर्वेतील ९० फूट रोडवरील म्हसोबा चौक परिसराजवळ घडली. या प्रकरणी काटे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------------------------

चिमुरडीचा विनयभंग

डोंबिवली : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, रविवारी सोनारपाडा परिसरातील शंकरानगरमध्ये एका आठ वर्षीय मुलीचा चॉकलेटसाठी पैसे देतो, असे सांगत रामनारायण यादव उर्फ बुढा या ५० वर्षीय आरोपीने विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

-----------------------------------------------

अभिनव एज्युकेशन ट्रस्टला मोफत संगणक

डोंबिवली : महिला दिनाचे औचित्य साधत केडीएमसीचे परिवहन सदस्य बंडू पाटील यांनी त्यांच्या परिवहन सदस्याच्या मानधनातून अभिनव एज्युकेशन ट्रस्टला दोन मोफत संगणक दिले. या वेळी कोरोना कालावधीत कोविडयोद्धा म्हणून काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही करण्यात आला. या वेळी परिवहन सभापती मनोज चौधरी, संजय पावशे यांच्यासह प्रकाश म्हात्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------

Web Title: Theft of tires with discs