सव्वालाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST2021-07-14T04:45:33+5:302021-07-14T04:45:33+5:30

मुंब्रा : भोलेनाथनगरमधील केजीएन अपार्टमेंट या इमारतीच्या रूम नंबर ४०१ या घराच्या दरवाजातून घरात प्रवेश करून हाॅलमधील बॅग, ...

Theft of jewelery worth Rs | सव्वालाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

सव्वालाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

मुंब्रा : भोलेनाथनगरमधील केजीएन अपार्टमेंट या इमारतीच्या रूम नंबर ४०१ या घराच्या दरवाजातून घरात प्रवेश करून हाॅलमधील बॅग, पर्समधील, तसेच सोन्याचे दागिने, असा एक लाख ३१ हजारांचा ऐवज अनोळखी चोराने चाेरून नेला आहे.

यात सोन्याच्या बांगड्या, चेन, अंगठ्या, कानातील रिंग, असे विविध प्रकारचे १ लाख २३ हजार रुपये किमतीचे दागिने, तसेच ६ हजारांचे दोन मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज, तसेच पाच एटीएम कार्ड, बँकेच्या लाॅकरच्या चाव्या आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. घरातील गृहिणीने रविवारी याबाबतची तक्रार शीळ-डायघर पोलीस ठाण्यात केली आहे.

Web Title: Theft of jewelery worth Rs