मीरारोडमध्ये बस खाली सापडून तरुण ठार
By धीरज परब | Updated: October 3, 2023 17:40 IST2023-10-03T17:39:35+5:302023-10-03T17:40:56+5:30
एक मरून रंगाची एक्टीव्हा आल्याने जाकीर याने अचानक ब्रेक मारला असता दुचाकी सह दोघे खाली पडले.

मीरारोडमध्ये बस खाली सापडून तरुण ठार
मीरारोड - समोरून दुचाकी आल्याने दुसऱ्या दुचाकीवरील स्वार ब्रेक मारल्याने खाली पडले. त्यावेळी बाजूने जाणाऱ्या बस खाली एक तरुण सापडून मरण पावल्याची घटना मीरारोड मध्ये घडली.
मीरारोड पोलीस ठाण्यात २ ऑक्टोबर रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी जाकीर जावेद खान ( ३७ ) रा . गीता नगर , मीरारोड हे आहेत. जाकीर हे त्रिशूल गुप्ता सह दुचाकीवरून रात्री साडे अकराच्या सुमारास रामदेव पार्क मार्गवरून मीरारोड स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याने चालला होता. गुप्ता हा मागे बसला होता. त्यावेळी एक एमबीएमटी ची बस मागून वेगात येऊन जाकीर यांच्या दुचाकीला क्रॉस करून जात होती.
त्याचवेळी एक मरून रंगाची एक्टीव्हा आल्याने जाकीर याने अचानक ब्रेक मारला असता दुचाकी सह दोघे खाली पडले. त्यावेळी गुप्ता हा एमबीएमटी बस च्या खाली सापडला. त्यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला .
या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी एमबीएमटी बसचा चालक नितीन तोरस्कर आणि अनोळखी मरून रंगाच्या एक्टीव्हाचा चालक दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.