शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धुराने गुदमरून महिलेचा मृत्यू, तर गुदमरलेल्या चौघेजण पडले बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:22 IST

The woman died of suffocation :बेडरूममध्ये असलेल्या एका महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला तर चौघेजण गुदमरून बेशुद्ध झाल्याची घटना घडली.

सदानंद नाईक उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावातील एका खाजगी बंगल्यात शॉर्टसर्किटमुळे शनिवारी मध्यरात्री आग लागली. बेडरूममध्ये असलेल्या एका महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला तर चौघेजण गुदमरून बेशुद्ध झाल्याची घटना घडली. दरम्यान चौघांची तब्येत ठणठणीत असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

 उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा पूर्वेतील 'आई' या बंगल्याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यावेळी बेडरूम मध्ये असलेल्या जयश्री भरत म्हात्रे या महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर आगीमुळे त्यांचा मुलगा व इतर तीन जणांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते होरपळून व श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेते असून त्यांची तब्येत ठणठणीत झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

आगीच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या जयश्री यांचे पती भरत म्हात्रे हे उत्तर भारतात देव दर्शनाला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवीत काही तासात आग आटोक्यात आणली. याबाबत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी घेत आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर