भिवंडीत दि बर्निंग ट्रकचा थरार; धावत्या ट्रकमधील सामानाने घेतला पेट

By नितीन पंडित | Updated: October 30, 2023 17:43 IST2023-10-30T17:43:30+5:302023-10-30T17:43:37+5:30

या आगीत कंटेनर मध्ये ठेवण्यात आलेले संपूर्ण फ्रिज जळून खाक झाले आहेत

The thrill of The Burning Truck in Bhiwandi; The goods in the running truck caught fire | भिवंडीत दि बर्निंग ट्रकचा थरार; धावत्या ट्रकमधील सामानाने घेतला पेट

भिवंडीत दि बर्निंग ट्रकचा थरार; धावत्या ट्रकमधील सामानाने घेतला पेट

भिवंडी : तालुक्यातील भिवंडी वाडा राज्य महामार्गावर सोमवारी बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला.या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक मधील सामानाने पेट घेतल्याने ट्रक मधून निघालेल्या धुरामुळे मार्गावरील नागरिकांनी हि बाब ट्रक चालकाच्या निदर्शनात आणून देताच ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला नेऊन थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली.मात्र ट्रक मधील सामान जळून खाक झाले आहे.

भिवंडी वाडा राज्य महामार्गावर वापी वरून फ्रिज घेऊन निघालेल्या कंटेनर मध्ये ठेवण्यात आलेले नवीन फ्रिज घेऊन कंटेनर तालुक्यातील महापोली येथे येताच या कंटेनर मध्ये ठेवण्यात आलेले फ्रिज ने अचानक पेट घेतला. या आगीत कंटेनर मध्ये ठेवण्यात आलेले संपूर्ण फ्रिज जळून खाक झाले आहेत.याची माहिती भिवंडी अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले. तो पर्यंत या कंटेनर मधील लाखो रुपयांचे संपूर्ण फ्रीज जळून खाक झाले आहेत.

Web Title: The thrill of The Burning Truck in Bhiwandi; The goods in the running truck caught fire