Thane: कचरा वर्गीकरणाची जागा बदलणार, बेथणी येथील २०० चौरस मीटर जागेत उभाराला जाणार प्रकल्प
By अजित मांडके | Updated: February 27, 2024 16:51 IST2024-02-27T16:51:28+5:302024-02-27T16:51:46+5:30
Thane: ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणारा कचरा सीपी तलाव येथे टाकला जातो, याठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर उभारण्याच्या कामाची जागा कमी पडत असल्याने आता तेथील जागेत बदल करुन बेथणी हॉस्पीटल येथील जवळच्या जागेत सेग्रीगेशन सेंटर उभारण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे.

Thane: कचरा वर्गीकरणाची जागा बदलणार, बेथणी येथील २०० चौरस मीटर जागेत उभाराला जाणार प्रकल्प
- अजित मांडके
ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणारा कचरा सीपी तलाव येथे टाकला जातो, याठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर उभारण्याच्या कामाची जागा कमी पडत असल्याने आता तेथील जागेत बदल करुन बेथणी हॉस्पीटल येथील जवळच्या जागेत सेग्रीगेशन सेंटर उभारण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणारा कचरा हा सुरवातीला सीपी तलाव येथे टाकला जातो, त्याठिकाणी कचºयाचे वर्गीकरण केले जाते, ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. परंतु येथील जागा कमी पडत असल्याने आता त्याठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर उभारणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे याठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर (१५५ चौरस फुटात) उभारण्याच्या कामासाठी काही जागा उपलब्ध होण्याबाबत माजी खासदार कुमार केतकर यांनी शिफारस केली होती. त्यानुसार या कामासाठी २९.८६ लाख रकेमची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. खासदार निधी अंतर्गत वागळे सीपी तलाव येथे सुका कचरा संकलन आणि कागद संकलन आणि पर्नचक्रीकरण करण्यासाठी कामासाठी आयुक्तांनी देखील मान्यता दिली आहे.
सद्यस्थितीत सीपी तलाव येथे मोठ्या प्रमाणात कचरा संकलित झालेला असल्याने त्याठिकाणी १५०० चौरस फुट जागा उपलब्ध नाही. तथापी बेथनी हॉस्पीटल जवळच्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी काही जागा उपलब्ध आहे. सध्यस्थितीत कचरा वर्गीकरणाची पत्रा शेड आहे. ज्यामध्ये वर्तकनगर प्रभागातील व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमधील संकलित केलेल्या सुक्या कचºयाचे काम केले जात आहे. या कामाबाबत वेळोवेळी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पाहणी होते. याठिकाणी पत्रा शेडच्या लगत ठाणे महापालिकेचे शौचालय बांधलेले आहे व बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकी लगत २०० चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. याठिकाणी सुका कचरा संकलन केंद्र व कागद संकलन पुर्नचक्रीकरण केंद्र निधीतून बांधले जाणार आहे. त्यातून कचरा वेचक महिलांना उदनिर्वाह देखील प्राप्त होणार आहे. तसेच प्लास्टीक व कागद पुर्नप्रक्रिया होणार आहे. त्यानुसार या जागा बदलाच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.