शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांच्या ट्विटनंतर पालिकेला आली जाग; कळवा, दिवा परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई

By अजित मांडके | Updated: December 7, 2022 18:02 IST

कळवा भागातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात आव्हाड यांनी बुधवारी सकाळी ट्विट करीत या बांधकामांना पाठीशी घालणारे ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल उपस्थित केला.

ठाणे : कळवा भागात होत असलेल्या बेसुमार अनाधिकृत बांधकामांसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत महापालिकेचा समाचार घेतला. यानंतर, तत्काळ खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बुधवारी कळवा, दिवा भागातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. तसेच अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात एमआरटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

कळवा भागातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात आव्हाड यांनी बुधवारी सकाळी ट्विट करीत या बांधकामांना पाठीशी घालणारे ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे मागील काही दिवस या भागातील बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अचानक जाग आली आणि त्यांनी तत्काळ या ट्विटची दखल घेत कळवा आणि दिव्यात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. महापालिकेकडे तक्रारी करुन वर्ष वर्ष कारवाई होत नसल्याची अनेक उदाहरणो ठाणोकरांनी पाहिली आहेत. किंबहुना पत्रची दखल देखील घेतली जात नाही. परंतु एका ट्विटची दखल घेत पालिकेने कारवाई केल्याचे आश्र्चय व्यक्त होत आहे.ठाणो महापालिका कार्यक्षेत्नातील नऊ प्रभागसमित्यांमध्ये अनाधिकृत बांधकाम करणा:यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्र मण विभागाला दिले आहेत. त्यानुसार प्रभागसमितील सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत कारवाई करण्यात येणार असून कारवाईची मोहिम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.बुधवारी अतिक्र मण विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे व अतिक्र मण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत कळवा आणि दिवा प्रभाग समितीतील अनाधिकृत बांधकामे पाडण्याची करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कळवा, दिवा परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालविला. प्रभाग समितीतील अनाधिकृत बांधकामावर कारवाईसोबत एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही महेश आहेर यांनी नमूद केले.परंतु एवढय़ा राजरोसपणो कळवा असेल किंवा दिवा, बाळकुम, ढोकाळी या भागात अनाधिकृत बांधकामे सुरु आहेत. त्याचे पुरावे देखील यापूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत. परंतु पुरावे दिल्यानंतरही पालिकेने कारवाई केल्याचे दिसून आले नाही. मात्र आव्हाडांनी एक ट्विट करताच अवघ्या काही तासात कारवाईला सुरवात झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस