शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालापाचोळा व फांद्यांच्या प्रक्रियेतून सुद्धा पालिकेला मिळणार उत्पन्न

By धीरज परब | Updated: April 13, 2024 19:16 IST

मीरा भाईंदर महापालिकेची शहरात उद्याने , मैदाने आहेत , या शिवाय विविध इमारती व कार्यालये असून त्या ठिकाणी लहान मोठी झाडे मोठ्या संख्येने आहेत .

मीरारोड - शहरातील झाडांचा पडणारा पाला पाचोळा , झाडांच्या लहान फांद्या आदी पासून मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून जळाऊ विटा तयार केल्या जात असून लवकरच त्याची क्षमता वाढवण्यात येऊन त्याच्या पासून पालिकेला आता नियमित उत्पन्न सुद्धा मिळणार आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेची शहरात उद्याने , मैदाने आहेत , या शिवाय विविध इमारती व कार्यालये असून त्या ठिकाणी लहान मोठी झाडे मोठ्या संख्येने आहेत . या शिवाय शहरातील सार्वजनिक रस्त्यावर झाडे आहेत . ह्या झाडांच्या छाटणी दरम्यान लहान मोठ्या फांद्या व पाला निघतो . सार्वजनिक ठिकाणी वा खाजगी ठिकाणी असलेली झाडे पावसाळ्यात पडण्याच्या घटना घडतात . तसेच  विकासकामात बाधा ठरतात म्हणून , घोकादायक म्हणून देखील मोठ्या प्रमाणात झाडे  तोडली जातात त्यावेळी त्यातून मोठ्या प्रमाणात झाडांचा पाला पाचोळा , फांद्या निघतात . नारळाच्या झावळ्या पडत असतात. 

ह्या आधी सदर झाडांचा पालापाचोळा , लहान फांद्या ह्या एखाद्या मोकळ्या भूखंडावर बेकायदा टाकला जात होता . तो सुकला कि त्याला आगी लावल्या जात होत्या . अश्या काही प्रकरणात पालिकेच्या अधिकारी - कर्मचारी यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे . तर झाडांचा हा पाला - फांद्या उत्तन  येथील डम्पिंगच्या ठिकाणी सुद्धा टाकला जातो . ह्या झाडांच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने अखेर गांभीर्याने घेत त्यावर प्रक्रिया करण्या बाबत विचार सुरु केला . 

ह्या झाडांच्या पाला पाचोळा व लहान फांद्यां पासून खत तसेच जळाऊ विटा बनवण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी सुमारे सव्वा वर्षां पूर्वी घोडबंदर येथील पालिका बस डेपो मागील जागेत प्रकल्प सुरु केला होता . सिरो एनर्जी ह्या कंपनीने सुमारे ५ टन क्षमतेचा प्रकल्प उभारला होता व त्यालाच प्रायोगिक तत्वावर  ६ महिने साठी चालवण्यास दिला होता . 

परंतु ६ महिन्यांची मुदत संपल्या नंतर मात्र नवीन ठेकेदार नेमण्या अभावी हा प्रकल्प बंद पडला होता . आयुक्त संजय काटकर यांनी झाडांच्या पाला पाचोळा व फांद्या वरील प्रक्रिया करणाऱ्या ह्या प्रकल्पाचा आढावा घेऊन निविदा प्रक्रिया करत महिन्याभरा पूर्वी सदर प्रकल्प नाशिकच्या अक्षता बायो मास्क फ्युएल ब्रिकेट या कंपनीस चालवण्यास दिला आहे . 

या ठिकाणी पालिकेने दिलेल्या मोकळ्या जागेत झाडांचा ओला सुका कचरा आणून गोळा केला जात आहे .   पूर्वी प्रमाणे मोकळ्या भूखंडात झाडांचा कचरा गोळा करण्याचे काम जवळपास बंद झाले आहे . रोज सुमारे १० ते १२ टन इतका झाडांचा कचरा निघत असतो . सदर कंपनीनेने तीन पाळ्या मध्ये प्रकल्प चालवून रोज सुमारे १० टन पाला पाचोळा व लहान फांद्यांवर प्रक्रिया करून त्या पासून जळाऊ विटा तयार करत आहे . सुक्या फांद्या , पाला हे क्रश केले जाते व नंतर साच्यात त्याच्या विटा तयार केल्या जातात.  तर हिरव्या पानां पासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे .  जळाऊ विटा तयार करून त्या विविध कंपन्या आदींच्या बॉयलर साठी पुरवल्या जात आहेत . तर पानांचे कंपोस्ट खत तयार केले जात आहे . 

अनिकेत मनोरकर ( अतिरिक्त आयुक्त , मीरा भाईंदर महापालिका ) - झाडांच्या पाने व लहान फांद्यांवर प्रक्रिया करून जळाऊ विटा आणि कंपोस्ट खत तयार केले जात असून ठेकेदार कंपनी हि स्वतः प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी नवीन यंत्रणा बसवणार आहे . जळाऊ विटाच्या प्रति टन मागे १ हजार ८०० रुपये तर कंपोस्ट खत च्या प्रति टन मागे १ हजार ८ रुपये रॉयल्टी पालिकेला मिळणार आहे . त्यामुळे शहरातील झाडांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सुटून पालिकेला त्या पासून नियमित उत्पन्न मिळणार आहे .