वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

By नितीन पंडित | Updated: February 9, 2023 17:01 IST2023-02-09T17:00:43+5:302023-02-09T17:01:03+5:30

पडघा-खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात सर्व वृद्धांसाठी होती जेवणाची व्यवस्था

The grandparents in the old age home wished the Chief Minister | वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने पडघा - खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात गुरुवारी दुपारी सर्व वृद्धांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांनी या गोड जेवणाचा आस्वाद घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी आव्हाने स्वीकारून तडफदारपणे उत्तुंग यश मिळविण्यासाठी विपुल ऊर्जा उमेद व उत्साह लाभो याकरिता या वृद्धाश्रमातील सर्व आजी-आजोबांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा असा फलक या वृद्धाश्रमात लावत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: The grandparents in the old age home wished the Chief Minister