उल्हासनगरात जीवघेणा हल्ला करणारा चोर नव्हेतर निघाला बायकोचा प्रियकर

By सदानंद नाईक | Updated: January 10, 2023 19:44 IST2023-01-10T19:43:41+5:302023-01-10T19:44:04+5:30

उल्हासनगर : उल्हासनगरात तरुणावर घरात जीवघेणा हल्ला आरोपी गजाआड सदानंद नाईक उल्हासनगर : कुर्ला कॅम्प येथील गुरुगोविद इमारती मध्ये ...

The fatal attack in Ulhasnagar was not a thief, but a lover of his wife | उल्हासनगरात जीवघेणा हल्ला करणारा चोर नव्हेतर निघाला बायकोचा प्रियकर

उल्हासनगरात जीवघेणा हल्ला करणारा चोर नव्हेतर निघाला बायकोचा प्रियकर

उल्हासनगर :उल्हासनगरात तरुणावर घरात जीवघेणा हल्ला आरोपी गजाआड सदानंद नाईक उल्हासनगर : कुर्ला कॅम्प येथील गुरुगोविद इमारती मध्ये राहणाऱ्या बंटी वाधवानी यांच्यावर घरात घुसलेल्या एका इसमाने शुक्रवारी सकाळी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. पोलीस तपासात हल्ला करणारा चोर नसून बायकोचा प्रियकर निघाल्याने, एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विट्ठलवाडी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-३ कुर्ला कॅम्प परिसरातील गुरू गोविंद पॅलेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बंटी वाधवानी कुटुंबासह राहतात. शुक्रवारी सकाळी पत्नीला सत्संगला सोडल्यानंतर, वाधवानी घरी आले. त्यावेळी घरी एकटे असलेले वाधवानी हे सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किचन रुम मध्ये जूस बनवीत होते. त्यावेळी त्यांना बेडरूम मधून काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने, त्यांनी बेडरूमकडे धाव घेतली. त्यावेळी पडद्याआड लपून बसलेल्या इसमाने वाधवानी यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यावेळी आरडाओरड झाल्याने, इमारतीच्या वॉचमनने गेट बंद करून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला फोन करून घटनेची माहिती दिली. काही मिनिटात पोलीस घटनास्थळी येऊन, त्यांनी चोरट्याचा शोध घेतला. यावेळी पाचव्या मजल्यावर लपून बसलेल्या असवस्थेत महेश ठारवानी हा पोलिसांना मिळून आला.

विठ्ठलवाडी पोलिसांनी महेश ठारवानी याला चोर समजून अटक केली. तर जखमी झालेल्या बंटी वाधवानी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान हल्ला करणारा महेश ठारवानी हा बायकोचा प्रियेकर निघाला असून बायको व सासू यांच्या सांगण्यावरूनच बायकोच्या प्रियेकर याने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप हल्ल्यात जखमी झालेल्या बंटी वाधवानी यांनी केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली पुढील तपास केला जात आहे. याप्रकरणी बंटी वाधवानी यांच्या पत्नीची व सासूची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: The fatal attack in Ulhasnagar was not a thief, but a lover of his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.