नव्या घरात स्थायिक होण्याचे स्वप्न झाले भंग

By पंकज पाटील | Updated: August 30, 2022 21:36 IST2022-08-30T21:34:24+5:302022-08-30T21:36:19+5:30

किरण हा मूळचा घाटकोपरचा रहिवासी असला तरी त्याने वर्षभरापूर्वीच अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन या भव्य संकुलात आपल्या स्वप्नातले घर खरेदी केले होते.

The dream of settling in a new house was shattered | नव्या घरात स्थायिक होण्याचे स्वप्न झाले भंग

नव्या घरात स्थायिक होण्याचे स्वप्न झाले भंग

अंबरनाथ: पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंबासह किरण घागे हा देखील प्रवास करीत होता. या अपघातात किरण घागे यांचा देखील जागीच मृत्यू झाला. किरण हा आपल्या अंबरनाथच्या नव्या घरात येत्या काही दिवसात स्थायिक होणार होता, मात्र घर गाठण्याआधीच त्याला मृत्यूने गाठले.

किरण हा मूळचा घाटकोपरचा रहिवासी असला तरी त्याने वर्षभरापूर्वीच अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन या भव्य संकुलात आपल्या स्वप्नातले घर खरेदी केले होते. येत्या काही दिवसात तो अंबरनाथच्या आपल्या नवीन घरात स्थायिक होणार होता. त्यासाठी त्याची लगबग देखील सुरू होती. आपल्या कुटुंबासह नवीन घरात स्थायिक होण्याचे त्याचे स्वप्न या अपघातात भंग पावले आहे. घराची पायरी चढण्याआधी त्याला मृत्यूने गाठले. 

किरण याचे कुटुंबीय दोन दिवसांपूर्वीच गणेशोत्सवासाठी गावी गेले होते तर किरण हा मंगळवारी पहाटे कोकणात गणेशोत्सवासाठी निघाला होता. 
 

Web Title: The dream of settling in a new house was shattered