तरुणीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरचा जामीन फेटाळला
By जितेंद्र कालेकर | Updated: June 16, 2024 23:47 IST2024-06-16T23:47:39+5:302024-06-16T23:47:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भाईंदरमधील २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या राहुल पाटील (वय ३३) ...

तरुणीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरचा जामीन फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाईंदरमधील २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या राहुल पाटील (वय ३३) या डॉक्टरचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याने जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता.
पीडित तरुणीची एका क्लासच्या गेट टुगेदर कार्यक्रमात आरोपी राहुल याची ओळख झाली होती. २०१७ ते २०२० या काळात त्यांची ही मैत्री होती. पुढे लग्नाच्या प्रलोभाने त्याने आधी तिच्यावर अत्याचार केले. नंतर अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला १६ नोव्हेंबर २०२० रोजी भाईंदरमध्ये एका मैदानात बोलविले. त्यानंतर मीरा रोड येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
याप्रकरणी त्याला ७ मे २०२४ रोजी अटक झाली होती. त्यानंतर १३ मे रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पीडितेच्या बाजूने ॲड. सागर कदम यांनी तर आरोपीच्या बाजूने ॲड. गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली.