ठाण्यात पार पडलं श्वानाचे वर्षश्राद्ध

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 28, 2023 16:15 IST2023-05-28T15:38:42+5:302023-05-28T16:15:51+5:30

श्वानाचे नाव शीरो असून हा गेले पंधरा वर्षे त्यांच्या घरामध्ये होता आणि त्याला मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळायला होता.

The death anniversary of the dog in Thane | ठाण्यात पार पडलं श्वानाचे वर्षश्राद्ध

ठाण्यात पार पडलं श्वानाचे वर्षश्राद्ध

ठाणे : ठाण्याच्या खोपट येथील दर्शन टॉवरमध्ये राहणाऱ्या किरण  जाधव यांच्या घरी असलेल्या पोमेलीयन श्वानाचे आज वर्षश्राद्ध ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरामध्ये करण्यात आले. किरण जाधव यांचा मुलगा केतन यांनी हे कार्य आज केले.

गुरुजी सचिन कुलकर्णी यांनी श्राद्ध विधी पार पाडले. या श्वानाचे निधन गेल्यावर्षी २८ मे रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी झाले होते. त्यावेळी त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले होते. या श्वानाचे नाव शीरो असून हा गेले पंधरा वर्षे त्यांच्या घरामध्ये होता आणि त्याला मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळायला होता.

Web Title: The death anniversary of the dog in Thane

टॅग्स :thaneठाणे