शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

सफाई कामगारांच्या मेहनतीने 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला मिळणार बळ

By जितेंद्र कालेकर | Updated: September 1, 2023 18:03 IST

सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागृकता यातून 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला.

ठाणेे: ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईचे नवीन पर्व १ सप्टेंबरपासून सुरू झाले. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता पातलीपाडा येथील सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन त्रिकोणी झाडू, कचरा वाहून नेण्यासाठी नवीन डबे यांची पूजा केली. त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला आणि त्यानंतर सर्व सफाई कर्मचारी त्यांच्या हद्दीतील रस्ते सफाईच्या कामासाठी रवाना झाले.

सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागृकता यातून 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला. पातलीपाडा येथील हजेरी शेड येथे बांगर यांच्यासह अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपयुक्त तुषार पवार उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या हजेरी शेड येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. ओवळा येथे नवीन गट सुरू करण्यात आला.

रस्ते सफाईच्या दोन्ही वेळांचे स्वच्छता निरीक्षक आणि कंत्राटदार यांनी तंताेतंत पालन करावे. हजेरी शेडवरील उपस्थिती आणि प्रत्यक्ष कामावरील कर्मचारी यांचा दैनंदिन अहवाल स्वच्छता निरीक्षकांनी नियमित दयावा. सकाळी ६ नंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही कंत्राटदाराची राहील. वारंवार असा प्रकार झाल्यास संबंधित स्वच्छता निरिक्षकांसह इतर अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. वेळा तपासण्यासाठी लवकरच बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीची व्यवस्थाही केली जाणार आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाबाबतच्या सर्व बाबी प्रशासनाकडून प्राधान्याने मार्गी लावल्या जातील. मात्र, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही बांगर यांनी दिला.

रस्ते स्वच्छतेबद्दल नागरिकांचा प्रतिसाद ही महत्वाचा आहे. त्यासाठी विभागवार नागरिकांचे गट तयार करता येतील. स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. त्याचबरोबर, दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या प्रथम इशारा द्यावा नंतर दंडाची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

कर्मचाऱ्यांशी संवाद-पातलीपाडा येथील हजेरी शेडमध्ये आयुक्त बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हातमोजे वापरताना काही अडचणी येतात का? त्याचा उपयोग होताे का? असे विचारल्यावर, घाण काढताना, गवत काढताना हातमोजे उपयोगी पडतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. उपस्थितीसह पगाराच्या वेळेबद्दलही आयुक्तांनी विचारणा केली. कामगारांचे पगार वेळेत झाले पाहिजेत, प्रत्येक हजेरी शेडवर कामगार संख्या, गटाचे नाव, कंत्राटदार याचे नाव सफाईच्या वेळा यांच्या िवभागाचा ठळक उल्लेख करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाEknath Shindeएकनाथ शिंदे