शॉकींग! ६५ वर्षीय बापानेच केला गतिमंद मुलीवर बलात्कार 

By धीरज परब | Updated: November 13, 2023 23:13 IST2023-11-13T23:13:18+5:302023-11-13T23:13:24+5:30

मीरारोड मध्ये बहिणी कडे राहणाऱ्या गतिमंद मुलीला तिच्या ६५ वर्षीय बापाने राजस्थान मधील झुनझुनवाला जिल्ह्यातील घरी मार्च महिन्यात नेले होते.

The 65-year-old father raped the active girl | शॉकींग! ६५ वर्षीय बापानेच केला गतिमंद मुलीवर बलात्कार 

शॉकींग! ६५ वर्षीय बापानेच केला गतिमंद मुलीवर बलात्कार 

धीरज परब

मीरारोड - ६५ वर्षीय बापाने आपल्या ३१ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या राजस्थान मधील घटने प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

मीरारोड मध्ये बहिणी कडे राहणाऱ्या गतिमंद मुलीला तिच्या ६५ वर्षीय बापाने राजस्थान मधील झुनझुनवाला जिल्ह्यातील घरी मार्च महिन्यात नेले होते . नोव्हेम्बर मध्ये ती तरुणी मीरारोड येथील बहिणी कडे परतली . त्यावेळी बहिणीला संशय आल्याने तिने विचारपूस केली असता नराधम बापानेच गतिमंद मुलीस मारहाण करून अनेकवेळा बळजबरीने बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी नया नगर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा घटना घडली त्या राजस्थान भागातील पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार आहे .

Web Title: The 65-year-old father raped the active girl