शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 22:47 IST

याप्रसंगी कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे गटातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली

मुंबई - शिवसेनेचा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही साजरा केला जात आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती आहे. त्यापैकी मनिषा कायंदे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं स्वागत करत मनोगत व्यक्त करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

याप्रसंगी कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे गटातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली. तसेच, गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गतीमानताच पाहून आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं कायंदे यांनी म्हटलं.  केवळ दोषारोप करणं आणि आत्म परिक्षण न करणं की, लोकं पक्ष सोडून का जात आहेत. यापुढेही अनेक लोकं इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे, असे म्हणत भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे सुतोवाचच मनिषा कायंदे यांनी केले. 

आपल्याला परफॉर्मन्स पाहिजेल, केवळ सकाळी उठून नुसती थुकरटवाडी बघण्यासाठी लोकं चॅनेल लावत नाहीत. देवी बसली म्हणून आमच्या देवदेवतांचा अपमान करणारे लोकं हिंदुत्त्वाचा शिवसेनेचा चेहरा कसे होतील? असा सवालही मनिषा कायंदे यांनी विचारला. कायंदे यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाव न घेता टीका केली. 

शिवसेना प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी 

दरम्यान, यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, मनिषा कायंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता, ठाकरे गटाकडून मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्रही शिवसेना ठाकरे गटाने जारी केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, आज त्यांच्याच सहीने मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचंही त्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाthaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई