शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

ठाण्याला पालघर भोवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 3:12 AM

शिवसेना-भाजपाचे संबंध ताणलेले : लोकसभा, विधानसभेला युतीतच प्रमुख लढत

ठाणे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ‘विश्वासघातकी’ ठरवल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातील कोपरी पुलाच्या भूमिपूजनात जसे उमटले, तसेच ते ठाणे जिल्ह्यातील यापुढील प्रत्येक निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी आपले नाक कापण्याच्या शिवसेनेच्या या प्रयत्नाचे उट्टे प्रत्येक निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न भाजपा करणार असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांतही या दोन पक्षांतच कडवी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होते आहे. वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांनाच फोडून शिवसेनेने दिलेली उमेदवारी भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचा विचार करून जरी भाजपाने काँग्रेसमधून फोडलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असली; तरी भाजपाचे मुंबई-ठाण्यातील विविध नेते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक, संघाच्या मुशीतील वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थांनी तेथे तळ ठोकला आहे. शिवसेनेनेही आपल्या नेत्यांची फौज तेथे उतरवली आहे. ठाणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवकांना एकेका परिसराची जबाबदारी देऊन तेथे मुक्काम ठोकण्याचे आदेश दिल्याने कल्याण-डोंबिवली, मुंबईनंतर हे दोन्ही पक्ष निकराने लढत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.नालासोपाऱ्यात सभा घेऊन भाजपाने परंपरागत गुजराती मतांसोबत उत्तर भारतीय मतांसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दाखवून दिले. वसई-विरार, नालासोपाºयातील बहुजन विकास आघाडीच्या मतांना सुरूंग लावण्यासाठी आणि त्यांच्याविरोधातील पंरपरागत ख्रिस्ती मते मिळवण्यासाठी त्यांच्यावर टीकेची झोड उठवताना त्यांचे विरोधक विवेक पंडित यांच्या श्रमजीवीची ताकद आपल्यासोबत ठेवली आहे. त्यातून वनगा यांच्या आदिवासी मतांत फूट पाडण्याचाही प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे.शिवसेनेची सारी भिस्त पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हारवर आहे. वसई-विरारमध्ये त्यांची पारंपरिक मते असली, तरी त्यात पूर्वीचे उपनेते विवेक पंडित यांचाही वाटा आहे. डहाणूमध्ये शिवसेनेला फारसे स्थान नाही. त्यामुळे ती कमतरता त्यांना अन्य परिसरातून भरून काढावी लागेल किंवा कम्युनिस्ट-मार्क्सवाद्यांना तेथे ताकद देत भाजपाच्या- खास करून संघाच्या परंपरागत मतांना सुरूंग लावावा लागेल. मात्र वसई-विरार, नालसोपारा, पालघर येथे होणाºया मतदानावर, त्यातही तेथील बहुजन विकास आघाडीच्या ताकदीवरच शिवसेनेची गणिते अवलंबून आहेत.सध्या पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारे वसई, नालासोपारा, बोईसर हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. पालघर शिवसेनेकडे; तर डहाणू आणि विक्रमगड हे भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यातही नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने केलेली बेगमी त्यांना लोकसभा पोटनिवडणुकीत उपयोगी पडेल, असा त्यांच्या नेत्यांचा होरा आहे.लोकसभेच्या यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीची मते वाढत पावणेतीन लाखांवर गेली. तेथील भाजपाची मते साधारण सव्वादोन ते अडीच लाखांदरम्यान होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेप्रमाणेच भाजपा, शिवसेना एकत्र होते. तेव्हा चिंतामण वनगा यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली. त्यामुळे त्यातील निम्मी ताकद आमची असल्याचा शिवसेनेचा दावा आहे.ठाण्यात काय घडू शकते?ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. तेथे भाजपाने सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.ठाणे जिल्ह्याच्या १८ आमदारांपैकी भाजपाकडे आठ, शिवसेनेकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार आमदार आहेत. त्यातील शिवसेनेच्या सहाही जागांवर उमेदवार देत भाजपा ठाणे जिल्ह्यावरील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018