शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

ठाणेची टीडीसीसी बँक देशात दुस-या तर राज्यात प्रथम क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:33 PM

हैद्राबात येथे नुकताच हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडल्याचे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. बँकेच्या ठेवींमधील वाढ, कर्ज वाटप, थकबाकीचे प्रमाण, अनुत्पादक कर्जाची टक्केवार, खेळत्या भांडवलमधील वाढ, भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण, स्वनिधी, गंगाजळी आॅडीट वर्ग आदी निकषांस अनुसरून बँकेच्या सुमारे ६० वर्षाच्या कालावधीत बँकेचा प्रथमच देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांकाची सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून गौरव झाला

ठळक मुद्देतेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मोहम्मद मेहमुदअली यांच्या हस्तेटीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पुरस्काराने सन्मानित मार्च अखेरपर्यंत बँकेच्या सुमारे सहा हजार १८ कोटींच्या ठेवे असून कर्ज एक हजार ८८९ कोटींचेबँकेचा एनपीए शुन्य टक्के असून ढोबळ नफा १२१.४९ कोटींचा व निव्वळ नफा २७.५० कोटींचा

ठाणे : देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वोत्कृष्ट कामकाजामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यामुळे बँकेला राष्ट्रीय पातळीवरील ‘बँको’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.       राष्ट्रीय  पातळीवरील सहकार क्षेत्रात महत्त्वाचा समजला जाणारा हा ‘बँको’ पुरस्कार तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मोहम्मद मेहमुदअली यांच्या हस्ते टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील माजी अध्यक्ष बाबाजी पाटील, शिवाजी शिंदे, अनिल मुंबईकर यांच्यासह बँकेचे सीईओ भगिरथ भोईर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हैद्राबात येथे नुकताच हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडल्याचे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. बँकेच्या ठेवींमधील वाढ, कर्ज वाटप, थकबाकीचे प्रमाण, अनुत्पादक कर्जाची टक्केवार, खेळत्या भांडवलमधील वाढ, भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण, स्वनिधी, गंगाजळी आॅडीट वर्ग आदी निकषांस अनुसरून बँकेच्या सुमारे ६० वर्षाच्या कालावधीत बँकेचा प्रथमच देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांकाची सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून गौरव झाला आहे.या आधीही बँकेला स्वयंम सहाय्यता बचत गटांसाठी उत्कृष्ट कामाचा विशेष पुरस्कार, विभागीय बचत गट लक्षांक पारितोषिक, नाबार्डव्दारे बँकेचा यथोचित गौरव, महाराष्ट्र स्टेट को आॅप बँक्स असोसिएशनचे विशेष पारितोषिक, तसेच उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान प्रथम क्रमांकाचा बँको अवार्ड आणि आता प्रथमच देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार टीडीसीसी बँकेला सन्मानपूर्वक बहाल करण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. देशातील ३४७ जिल्हा बँकांपैकी या पुरस्काराच्या स्पर्धेत देशभरातील १०० बँका होत्या, असे पाटील म्हणाले.        मार्च अखेरपर्यंत बँकेच्या सुमारे सहा हजार १८ कोटींच्या ठेवे असून कर्ज एक हजार ८८९ कोटींचे होते. याशिवाय कॅपिटल फंड २००.४४ कोटी आहे. बँकेचा एनपीए शुन्य टक्के असून ढोबळ नफा १२१.४९ कोटींचा व निव्वळ नफा २७.५० कोटींचा झाल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. सध्या बँकेकडे ८६१.२३ कोटींचा स्वनिधी असून रिझर्व्ह फंड ११० कोटींचा असून भांडवल पर्याप्तता१४.७७ टक्के असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. या आर्थिक पाटबळाच्या जोरावर बँकेने नुकत्याच नवनविन योजना हाती घेऊन शेतकºयांसह बेरोजगारांसाठी आर्थिक पाटबळ जाहीर केले आहे. यामध्ये पर्यटनासाठीच्या कर्जासह ६० लाखांचे व्यवसाईक, गृहनिर्माण संस्थाच्या पुर्नबांधणीसाठी ८५ टक्के कर्ज, सौरऊर्जा प्रणालीसाठी आणि परमीट असलेल्या चालकास रिक्षा खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार