शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणेकरांवर २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड , जुलैपासून दरवाढ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:15 IST

ठाणेकरांवर जुलै २०१९ पासून २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड  कोसळणार आहे. ठाणे परिवहन प्रशासनामार्फत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास यापुढे २ रुपयांना महागणार आहे.

ठळक मुद्देसहाव्यांदा होणार तिकीट दरवाढ२ ते ५ रुपयांपर्यंत होणार तिकीट दरवाढ

ठाणे - ठाणेकरांसाठी सुखकर प्रवासी हमी न देता जुन्याच योजनांचा मुलामा देत ठाणे परिवहन सेवेने यंदा ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढ लादण्याचे निश्चित केले आहे. गुरुवारी ठाणे परिवहन सेवेने समितीसमोर २०१९-२० चा ४७६. १२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. डिझेलचे वांरवार वाढत जाणारे दर, सीएनजीचे वाढते दर, परिवहन सेवेच्या संचलनात असलेल्या जुन्या बसेस, जीएसटीमुळे वाहनांच्या किमंतीत झालेली वाढ आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मेट्रोच्या सुरु असलेल्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असल्याने सध्याच्या प्रवासी भाड्यात २० टक्के भाडेवाढ प्रस्तावित करण्यात येत असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानुसार पहिल्या टप्यासाठी २ रुपये आणि शेवटच्या टप्यासाठी ५ रुपये दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी परिवहन समिती याबाबत काय निर्णय घेणार याकडे समस्त ठाणेकरांच्या नजरा लागल्या आहेत.                ठाणे परिवहन सेवेमार्फत गुरुवारी परिवहन समितीसमोर २०१८-१९ चे २५१.०३ कोटी आणि सन २०१९-२० चे ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर सहाव्यांदा तिकीट दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० बसेस असल्या तरी देखील रस्त्यावर ८० च्या आसपास बसेस धावत आहेत. तर जीसीसीच्या माध्यमातून १९० आणि एसी २५ बसेस अशा एकूण २९५ च्या आसपास बसेस धावत आहेत. परिवहनमधून अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असून परिवहनचे उत्पन्न हे ३० लाखांच्या घरात आहे. ठाणेकरांना आजही सुखकर प्रवासी हमी परिवहन प्रशासनाने दिलेली नाही. असे असतांना सहाव्यांदा परिवहनने ही २० टक्के तिकीट दरवाढ सुचविली आहे.चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजी दरात झालेली लक्षणीय वाढ, परिवहन सेवेच्या संचलनात असलेल्या जुन्या बसेस यामुळे डिझेलचा होणारा जास्त वापर तसेच शासनाने कार्यान्वित केलेल्या जीएसटीमुळे वाहनांच्या सुटेभाग खरेदी किमंतीत झालेली दरवाढ यासह धक्कादायक म्हणजे सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे कारणही परिवहन प्रशासनाने भाडेवाढीमध्ये पुढे केले आहे. या सर्व बाबींमुळे परिवहन सेवेची दैनंदिन महसुली तुटीमध्ये वाढ होत आहे. ही तुट भरुन काढण्यासाठी इतर उत्पन्नाच्या स्त्रोतांबरोबर भाडेवाढ ही प्रस्तावित करण्यात येत असल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. या आर्थिक वर्षात जुलै २०१९ नंतर ही परिवहनच्या तिकीट दरात २० टक्के भाडेवाढ या प्रमाणे दैनंदिन ३.४० लाख नुसार संभाव्या भाडेवाढ अपेक्षित रक्कम ९ कोटी ३५ लाख अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यानुसार प्रवासी उत्पन्नापोटी १६३.७४ कोटींची जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. 

सहाव्यांदा होणार भाडेवाढयापूर्वी १ जानेवारी २००३, ११ आॅगस्ट २००७, १६ जून २०११ आणि मार्च २०१३ मध्ये भाडेवाढ झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पाचव्यांदा भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता २०१९ मध्ये सहाव्यांदा भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. 

२ ते ५ रुपये अशी असेल भाडेवाढसाधी बस सध्याचे दर प्रस्तावित दर एसी बस सध्याचे दर प्रस्तावित दरपहिला टप्पा ७ रुपये ९ रुपये २० रुपये २५ रुपये११ वा टप्पा २५ रुपये २९ रुपये ७५ रुपये ८० रुपये२३ वा टप्पा ५१ रुपये ५६ रुपये १३५ रुपये १४० रुपये 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBudgetअर्थसंकल्प