आयुक्तांसाठी ठाणेकर पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:08 IST2018-02-24T00:08:57+5:302018-02-24T00:08:57+5:30

ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसत्रावरून सध्या विविध वक्तव्य, घडामोडी सुरू आहेत. त्यानंतर मात्र पुन्हा आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी सामान्य ठाणेकर एकवटले आहेत

Thanekar reunited for commissioner | आयुक्तांसाठी ठाणेकर पुन्हा एकत्र

आयुक्तांसाठी ठाणेकर पुन्हा एकत्र

ठाणे : ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसत्रावरून सध्या विविध वक्तव्य, घडामोडी सुरू आहेत. त्यानंतर मात्र पुन्हा आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी सामान्य ठाणेकर एकवटले आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी ठाणे सिटीझन फाउंडेशनच्यावतीने आणि इतर संस्थांच्या सहकार्याने रविवार २५ फेब्रुवारी रोजी ठाणेकरांची बैठक आयोजिली आहे.
रस्ता रुंदीकरण, अनधिकृत गाळे, हॉटेलवर कारवाई याबाबत ठोस भूमिका घेणारे आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी ठाणेकरांनी सह्यांची मोहिम घेतली होती. आतापर्यंत सुमारे १ लाख ठाणेकरांनी सह्या देऊन त्याला उत्तम प्रतिसाद दिला. अशावेळी जयस्वाल यांची बदली न होता त्यांनी ठाण्यात आणखी काही काळ राहून विकासकामे पूर्ण करावी अशी बहुतेक ठाणेकरांची इच्छा आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्य ठाणेकर म्हणून आपल्याला काही पर्याय सुचविता येईल का? किंवा ठाणेकरांच्या त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत यावर बैठक होणार आहे.

Web Title: Thanekar reunited for commissioner