‘काहीतरी कर’च्या पाठीशी ठाणेकर
By Admin | Updated: October 6, 2015 00:28 IST2015-10-06T00:28:00+5:302015-10-06T00:28:00+5:30
लोकमतने सुरू केलेल्या काहीतरी कर ठाणेकर या उपक्रमांतर्गत ठाणे शहरात तलाव संवर्धन, ठाणेकरांनी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये तसेच सोनसाखळी

‘काहीतरी कर’च्या पाठीशी ठाणेकर
लोकमतने सुरू केलेल्या काहीतरी कर ठाणेकर या उपक्रमांतर्गत ठाणे शहरात तलाव संवर्धन, ठाणेकरांनी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नये तसेच सोनसाखळी चोरी टाळण्यासाठी महिलांनी कसे सतर्क रहावे यासारख्या विविध विषयांवर जनजागृतीपर मोहिम राबविली आहे. भरपावसात भिजून महापौर संजय मोरे यांनी रायलादेवी तलावाच्या संवर्धनासाठी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी त्यांना तलाव संवर्धनाबाबतचे निवेदन लोकमतच्यावतीने देण्यात आले. शनिवारी दुपारी काहीतरी कर ठाणेकरच्या सर्व चमूने तीन हात नाका येथे हॉर्न न वाजवण्यासाठी गुलाबाचे फुल देऊन रिक्षाचालक, कारचालक, मोटारसायकलस्वार यांना आवाहन केले. महिलांनी सोनसाखळी चोरांपासून कशी सावधानता बाळगावी याविषयी ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांनी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मार्गदर्शन केले.
स्टार प्रवाह वाहिनीवरील
कलाकारांचा महिलांसमवेत सुसंवाद
महिलांनी स्वसंरक्षणासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. साखळी चोरांची स्वत:ची मोठी टीम असते. सध्याच्या काळात या सर्व गोष्टीला न घाबरता हिमंतीने तोंड देणे भाग आहे. लोकमततर्फे रबिवण्यात येणार हा सामाजिक उपक्र म कौतुकास्पद आहे. प्रत्येक व्यक्तीला पोलीस गुन्हेगार ठरवितात ही सामन्य माणसाची संकल्पना चुकीची आहे. तसेच आपण छोटी मोठी कामे लवकर होण्यासाठी पैसे देतो त्यामुळे भ्रष्टाचार वाढतो हा भ्रष्टाचार कमी होणे गरजेचे आहे असा सल्लाही या कलाकरांनी उपस्थित महिलांना दिला. - धनश्री क्षीरसागर, जगन्नाथ निवगुणे, कल्पेश सावंत ( स्टार प्रवाहवाहिनीवरील लक्ष्य मालिकेतील कलाकार अनुक्रमे प्रेरणा सरदेसाई, विरेंद्र कदम, मारुती जगदाळे ),
सोनसाखळी चोऱ्यांबाबत महिलांनी सतर्क व सजग रहावे. तसेच चोरी झाल्यानंतर त्वरीत १०० क्रमांकावर पोलिसांना फोन लावून सगळी माहिती द्यावी तसेच फुटपाथवरून चालावे. ही चोरी करणारी तरूण मंडळी २०-२५ वयोगटातील असतात. तसेच ते मादक द्रव्याच्या अधिन असतात त्यामुळे त्यांना धक्का दिल्यास ते खाली पडतात व पोलिसांना पकडण्यास सोपे जाते. लोकमतने चालू केलेल्या काहीतरी कर ठाणेकर या चळवळींतर्गत स्त्रियांना सतर्क करण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजाच्या दृष्टिकोनातून प्रभावी आहे.
- नागेश लोहार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषन विभाग, ठाणे