ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक संपासह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 17:44 IST2019-08-09T17:40:09+5:302019-08-09T17:44:30+5:30

 या एक दिवशीय लाक्षणिक संपात महाराष्ट्र  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय कृती समिती, लेखा कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी युनियन, औषध निर्माण अधिकारी संघटना, कास्ट्राईब संघटना आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे बहुतांशी लिपीक व लेखा संवर्ग कर्मचा-यांनी आज एक दिवशीय लाक्षणिक संप केला.

Thane Zilla Parishad fast with symbolic collision of staff | ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक संपासह उपोषण

लिपीक व लेखासंवर्ग कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकत्र येऊन प्रलंबित विविध मागण्यांसाठी उपोषण

ठळक मुद्देप्रलंबित असलेल्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करण्यात यावी२००५ ला लागलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेपाच दिवसाचा आठवडा लागू करणे

ठाणे : जिल्हा परिषदेतील काही संघटनेच्या नेतृत्वाखाली लिपीक व लेखासंवर्ग कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकत्र येऊन प्रलंबित विविध मागण्यांसाठी उपोषण व एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे.
             या एक दिवशीय लाक्षणिक संपात महाराष्ट्र  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय कृती समिती, लेखा कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी युनियन, औषध निर्माण अधिकारी संघटना, कास्ट्राईब संघटना आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे बहुतांशी लिपीक व लेखा संवर्ग कर्मचा-यांनी आज एक दिवशीय लाक्षणिक संप केला. एवढेच नव्हे तर प्रलंबित विविध मागण्यांसाठी कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात बसून उपोषणही केले आहे. प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी          कर्मचा-यांनी घोषणाबाजी करीत उपस्थिताना मार्गदर्शन केले आहे.
लिपीक, लेखा, परिचर, वाहन चालक, आरोग्य कर्मचारी आदी संवर्गाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करण्यात यावी, समान वेतन, समान ताण या तत्वानुसार समान फायदे तत्व लागू करून २००५ ला लागलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व करार पध्दतीने केलेल्या नेमणूका प्रथम दिवसापासून कायम करणे, आरोग्य विभागात खाजगीकरणाच्या माध्यमातून योजना लागू केल्या असून त्या त्वरीत बंद करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे आदी मागण्यांसाठी कर्मचा-यांनी लाक्षणिक संपासह उपोषणाव्दारे शासनाचे लक्ष वेधले आहे.
........

Web Title: Thane Zilla Parishad fast with symbolic collision of staff