स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दौड, दीड हजारांहून अधिक युवक धावले
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 11, 2025 13:06 IST2025-01-11T13:05:52+5:302025-01-11T13:06:29+5:30
Thane News: स्वामी विवेकानंदाचे विचार समाजात पोहोचावे यासाठी स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र आणि त्यांचे विचार असलेले टी शर्ट घालून दीड हजाराहून युवक युवा दौड मध्ये धावले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दौड, दीड हजारांहून अधिक युवक धावले
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - स्वामी विवेकानंदाचे विचार समाजात पोहोचावे यासाठी स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र आणि त्यांचे विचार असलेले टी शर्ट घालून दीड हजाराहून युवक युवा दौड मध्ये धावले. ही युवा दौड असली तरी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच ठाणेकर सहभागी झाले होते.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्षे स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी युवा दौंड चे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून न्यास आणि अ. भा. विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘एक धाव देशासाठी’ या उपक्रमांतर्गत ही युवा दौड संपन्न झाली. प्रत्येकाने आपली ही दौड मोबाईलच्या कॅमेरात बंदिस्त केली. या युवा दौड मध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जवळपास दीड हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या दौडची सुरुवात आज सकाळी ६. ३० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दौड ज्योत प्रज्वलीत करून तसेच प्रतिज्ञा घेऊन रंगो बापूजी गुप्ते चौक येथून झाली. मासुंदा तलावाजवळील रंगो बापूजी गुप्ते चौक येथून युवा दौडला सुरुवात झाली. टेंभी नाका - सिव्हील रुग्णालय - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड - खोपट सिग्नल - डावीकडे एसएमसी - वंदना टॉकीज - तीन पेट्रोल पंप - हरीनिवास सर्कल - जय भगवान सभागृह - विष्णूनगर - राम मारुती रोड येथून तलावपाळी मार्गे गडकरी रंगायतन पुन्हा बापूजी गुप्ते चौक येथे या युवा दौडचा समारोप झाला.युवकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून युवा दौडच्या मार्गांवरील चौकाचौकात स्वयंसेवक उभे करण्यात आले होते. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पोलीस बंदोबस्त देखील होता.