शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

ठाण्याचा पालकमंत्री महायुतीचाच होणार; पक्षश्रेष्ठीच घेतील निर्णय - कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 06:31 IST

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी करणे रास्त आहे. असे असले तरी विधानसभा व लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप महायुती एकत्रितपणे लढली आहे

कल्याण : ठाणे जिल्ह्यात भाजपला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना-भाजप महायुती असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री हा महायुतीचाच असेल, असा दावा भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी केला आहे.

ठाणे जिल्ह्यात भाजपला आठ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या तुलनेत शिवसेनेचे कमी उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री भाजपच्या आमदाराला मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

याविषयी पाटील यांना विचारले असता, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी करणे रास्त आहे. असे असले तरी विधानसभा व लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप महायुती एकत्रितपणे लढली आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळाल्या हे गणित असले तरी पालकमंत्री शिवसेनेचा का भाजपा, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री कोणत्या पक्षाचा असेल हे ठरवतील. त्यामुळे पालकमंत्री हा महायुतीचा असेल. अद्याप सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेला नाही. त्यानंतरच पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकरचठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याण -मुरबाड रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर मंजूर झाला आहे. त्याचे टेंडर काढून प्रकल्पाचे काम आठ महिन्यांत सुरू केले जाईल. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग पुढे अहमदनगरपर्यंत नेण्याचा प्रयत्न राहिल. १८ नोव्हेंबरपासून संसदीय अधिवेशन सुरू होणार असून, त्यात भिवंडी मतदारसंघातील काही विषय मांडणार असल्याचे पाटील म्हणाले.दिवाळी पहाट : पश्चिमेतील साई चौकात कपिल पाटील फाउंडेशनतर्फे सोमवारी दिवाळी पहाट कार्यक्रम होत आहे. त्यात पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर उपस्थित राहणार आहे. खोलगडे अर्धा तास गाणी सादर करणार आहेत. तर, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे हे हास्याचे फटाके फोणार आहेत.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाthaneठाणे