Thane: दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ठाण्यातील उपवन तलाव ओव्हरफ्लो
By अजित मांडके | Updated: July 20, 2023 13:31 IST2023-07-20T13:31:38+5:302023-07-20T13:31:55+5:30
Thane Rain Update: गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील आकर्षणाचे एक केंद्र असणारा उपवन तलाव ओव्हरफ्लो झाला.

Thane: दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ठाण्यातील उपवन तलाव ओव्हरफ्लो
- अजित मांडके
ठाणे - गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील आकर्षणाचे एक केंद्र असणारा उपवन तलाव ओव्हरफ्लो झाला. दोन दिवसांत तब्बल 315 मिलिमीटर पाऊस पडल्याने तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील बरेचसे तलावांत मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढलेला असून येऊरच्या पायथ्याशी असणारा निसर्गरम्य असा उपवन तलाव काठोकाठ भरून पाणी तळ्याच्या बाहेर लागले येऊ लागले. तलावाच्या आजुबाजूस परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून ठाणे महापालिका प्रशासनाने तलावाच्या आस पास जाण्यास मनाई केली.