Thane: मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा

By अजित मांडके | Published: August 22, 2023 05:41 PM2023-08-22T17:41:23+5:302023-08-22T17:42:16+5:30

Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विट करीत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.

Thane: Unauthorized constructions in Mumbra to Sheel area, Jitendra Awha claims | Thane: मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा

Thane: मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा

googlenewsNext

- अजित मांडके
ठाणे - कळवा, मुंब्य्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विट करीत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. एक-एका इमारतीमध्ये ४०-४० लाख रुपये वाटले जात आहेत. एका लेडी डॉनने ठाणे महानगरपालिका प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन ब्लॅकमेलींगचा मोठा व्यवसाय सुरु केला असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. कुठल्याही इमारतीचे बांधकाम चालू असेल तर त्याठिकाणी बुलडोझर, पोकलेन घेऊन जायचे, तोडण्याच नाटक सुरु करायचे आणि नंतर १५ ते २० लाख रुपये घेऊन सेटलमेंट करायची. यामध्ये सगळ्यांचेच हफ्ते बांधलेले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ज्या इमारती धोकादायक होत्या त्याच्यातील एक इमारत शिबली नगरमध्ये निष्कासित करण्यात आली होती. त्या सगळ्यांना म्हाडामध्ये घरे देखिल देण्यात आली. परंतु आता त्याच इमारतीचे पुर्नबांधकाम अनधिकृतरीत्या सुरु करण्यात आले आहे. एकतर म्हाडामध्ये कोणाला घरे दिली, कशी दिली याचे कुठलेही आॅडीट ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत केलेले नाही. तसेच जी केस म्हाडा संबंधी झाली होती आणि ज्यामध्ये वीर नावाच्या अधिका-याचे स्टेटमेंट होते ज्याच्यावर ही सगळी केस अवलंबून होती, त्या वीर चे जे म्हणणं होत. जे त्याच्याकडून लिहून घेतलं होते, ती कागदपत्रेच गहाळ असल्याचा दावाही त्यांनी केला. हे मिटविण्यासाठी मुंब्यार्तील एका जावेद नावाच्या व्यक्तीला ५० लाख रुपये देण्यात आले आणि त्यानंतर पोलीस अधिका-यांना किती पैसे देण्यात आले याची जावेदला व्यवस्थित माहिती आहे. त्या पैशांमुळेच म्हाडाची केस दाबण्यात आली.

म्हाडामध्ये कोणा-कोणाला घरे दिली हे ना तर आजपर्यंत ठाणे महानगरपालिकेला माहिती ना त्याबाबतचे काही आॅडीट आहे. तसेच ज्या योजनेअंतर्गत अधिकृत इमारतीमध्ये देखिल ठाणे महानगरपालिकेला फ्लॅट देण्यात येतात ते फ्लॅट कोणाला देण्यात आले? कसे देण्यात आले? त्या संबंधी तक्रार करुन देखिल ठाणे महानगरपालिकेने हे प्रकरण गांभीयार्ने घेतले नाही. ठाणे महानगरपालिकेची लूट ही गुन्हेगारी माध्यमातून करण्यात येत आहे आणि गुन्हेगार दुदेर्वाने ठाणे महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत. काही भाग्यवान असे आहेत की, त्यांना मुंब्यार्तील म्हाडामध्ये एक-एक मजला देण्यात आला आहे. तसेच लोढामध्ये जी काही दुकाने होती ती देखिल आपल्याच नातेवाईकांना देण्याचा घाट ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी घातला आणि तो यशस्वी देखिल करुन दाखवला. ठाणे महानगरपालिकेवर कायद्याचे राज्य आहे की, नाही हेच कळत नाही.

कौसा ते शीळ येथे जवळ-जवळ २०० अनधिकृत बांधकामे चालू आहेत. ठाणे महानगरपालिका आयुक्त आपण याकडे कधी लक्ष देणार. आपण यावर कधी कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Web Title: Thane: Unauthorized constructions in Mumbra to Sheel area, Jitendra Awha claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.