शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
2
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
3
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
4
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
5
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
6
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
7
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'चे आकडे जाहीर, आंध्र प्रदेश, तेलंगणात भाजपाची मुसंडी
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

Thane: ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत

By अजित मांडके | Published: April 12, 2024 10:00 AM

Thane Accident News: औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली.

- अजित मांडके ठाणे -औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. याचदरम्यान पाठी मागून येणारी कार त्या ट्रक धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी, मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. या मार्गावर सुमारे एक तास वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. तसेच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडले. या अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून तेथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम (40) हा निघाला होता. सकाळी साडेसहाच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर आल्यावर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरती जाऊन जोरात आदळला. तसेच तो तेथील रस्त्यावरती उलटला. या धडकेत ते झाड ही पडले होते. तसेच त्या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारे कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकासह 5 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते पाच ही जण मुंबई मुलुंडमधील रहिवासी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, नौपाडा पोलीस हे ०१-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे ०१-तासापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने धीम्या गतीने सुरू होती. तर अपघातामुळे रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केले. तसेच अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पोलीस कर्मचाऱ्यांनी ०१-हायड्रो मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात