ठाणे परिवहनचे ४५८. १३ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 12:46 PM2021-01-22T12:46:39+5:302021-01-22T12:47:40+5:30

ठाणे महानगरपालिका व त्यांचा अंगीकृत असलेला परिवहन उपक्रम ही यातून सुटलेले नाही. परिवहन उपक्रमाच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम होऊन, सुमारे रु. 80 कोटीच्या अपेक्षित प्रवासी उत्पन्नाला मुकावे लागले आहे.

Thane Transport budget of Rs. 458.13 crore submitted | ठाणे परिवहनचे ४५८. १३ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

ठाणे परिवहनचे ४५८. १३ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

Next
ठळक मुद्देठाणे महानगरपालिका व त्यांचा अंगीकृत असलेला परिवहन उपक्रम ही यातून सुटलेले नाही. परिवहन उपक्रमाच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम होऊन, सुमारे रु. 80 कोटीच्या अपेक्षित प्रवासी उत्पन्नाला मुकावे लागले आहे.

ठाणे - सन 2020-21 या आर्थिक वर्षात सर्व जगावर आलेल्या कोरोना या महामारीच्या संकटामुळे जगाची, देशाची, राज्याची किंबहुना ठाणे शहराची आर्थिक प्रगती कुंठीत झाली आहे. आपला देश, पर्यायाने आपण सर्व यातून हळूहळू बाहेर येत आहोत. भारताने कोव्हिड-19 या संसर्गजन्य विषाणूवर विजय प्राप्त करणेसाठी लस काढण्यात आली असून, लसीकरणाची सुरुवात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. ही आपणासर्वांकरीता आनंदाची बाब आहे. शासनाने कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकरीता केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे आपल्याला मोठ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे. 

ठाणे महानगरपालिका व त्यांचा अंगीकृत असलेला परिवहन उपक्रम ही यातून सुटलेले नाही. परिवहन उपक्रमाच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम होऊन, सुमारे रु. 80 कोटीच्या अपेक्षित प्रवासी उत्पन्नाला मुकावे लागले आहे. अत्यावश्यक सेवेत गणलेल्या या शासकीय यंत्रणाना या महामारीत पहिले सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महापालिकेच्या माध्यमांतून कोव्हिड रुग्णांकरीता, अत्यावश्यक सेवेत काम करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना ने-आण करणेस तसेच, परप्रांतीय प्रवाशांना परगावी जाणे करीता अनेक प्रवासी सेवा-सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या मध्ये 30 मिडी बसेसचे रुग्णवाहीका म्हणून वापर करण्यांत आला असून कोव्हिड रुग्णांना जलदगतीने सेवा देण्याच्या प्रयत्नात परिवहन उपक्रमाचे 175 कर्मचा-यांना कोव्हिड या विषाणूची लागण झाली व त्यामध्ये 14 कर्मचा-यांना आपले प्राण गमवावे लागले. अशा माझ्या अधिकारी/कामगार बंधुना मी परिवहन प्रशासनाच्या वतीने विनम्र श्रध्दांजली वाहतो, आणि सन 2020-21 सुधारित व सन 2021-22 मूळ अंदाजपत्रकाच्या प्रस्तावनेला सुरुवात करीत आहे.

ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2020-21 सुधारित व सन 2021-22 च मूळ अंदाजपत्रक मा.परिवहन समितीस, परिवहन व्यवस्थापक म्हणून सादर करीत आहे. सन 2020-21 चे सुधारित अंदाजपत्रक महसुली व भांडवली खर्चासह रु.218 कोटी 86 लक्ष चे सन 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक महसुली व भांडवली खर्चासह रु.458 कोटी 13 लक्ष रकमच सादर करण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा, ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सुधारित) 1949 मधील अनुसुची प्रकरण 4 वर्ग 3 (ब) अन्वये, 'अत्यावश्यक सेवा' म्हणून संबोधण्यांत आलेली आहे. ठाणे शहराचा समतोल व सर्वांगिण विकासामध्ये परिवहन उपक्रमाची सेवा, ही अत्यंत महत्वाची अशी सेवा आहे. ठाणे शहरांतील व उपनगरांतील प्रवाशांना जास्तीत-जास्त व चांगल्या त-हेने वाहतुक सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न याव्दारे करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत परिवहन सेवेच्या ताफ्यांत कार्यरत असलेल्या एकूण 364 बसेस पैकी ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून चालविण्यासाठी 124 बसेस असून, त्यापैकी आजमितीस वोल्वोसह सरासरी 110 बसेस चालविण्यात येतात. JnNURM अंतर्गत प्राप्त झालेल्या 190 अधिक 50 महिलांकरीता तेजस्विनी बसेस अशा एकूण 240 बसेस पैकी 223 बसेस GCC तत्वावर चालविणेत येत आहेत. या व्यतिरिक्त सन 2021-22 आर्थिक वर्षा मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमांतून 200 बसेस, PPP (Public-Private-Participation) तत्वावर MMRDA यांचेकडून 100 इलेक्ट्रीक बसेस व ठाणे महापालिकेकडून 50 मिडी बसेस खरेदी करण्याचे नियोजन आहे. माहे डिसेंबर 2021 अखेर पर्यंत परिवहन उपक्रमाच्या बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित आहे. यामुळे परिवहन सेवेच्या ताफ्यांत नविन 350 बसेसची भर पडणार आहे. अशी एकूण सुमारे 700 बसेस दैनंदिन प्रवासी संचलनासाठी उपलब्ध करुन ठाणे महानगरातील वाढत्या नागरिकाना जास्तीत-जास्त सेवा उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न राहतील.   

ठाणे शहर हे मुंबई शहरालगत असलेले उपनगर आहे. ठाणे महापालिका हद्दीमध्ये ठाणे महापालिकेतर्फे ठाणेकर नागरिकांना उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात यत आहेत. परिणामी ठाणे शहरांतील लोकसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या 18 लक्ष 19 हजार इतकी आहे. जनगनणेची आकडेवारी लक्षात घेता, सन 2020 अखेर पर्यंत ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे 25 लक्ष इतकी अपेक्षित आहे. "सेट्रल इन्स्टीटयुट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट C.I.R.T. पुणे' या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुरविणेकरीता 1 लाख लोकसंख्येस 30 बसेस या प्रमाणे परिवहन सेवेस आजमितीस सुमारे 750 बसेसची आवश्यकता आहे.

वाहतुकी पासूनचे उत्पन्न :-

1) प्रवासी भाडे उत्पन्न :- सन 2021-22 मूळ अंदाजपत्रकांत साध्या 94 बसेस भाडयापोटी रक्कम रु. 22 कोटी 99 लक्ष इतके उत्पन्न, JnNURM-2 अंतर्गत आलेल्या 190 बसेसपासून रु.57 कोटी 26 लक्ष, वातानुकुलीत वोल्वो 30 बसेस पासूनचे उत्पन्न रु.16 कोटी 56 लक्ष, व महिलांकरीता 50 तेजस्विनी बसेसपासून रक्कम रु. 9 कोटी 46 लक्ष, असे फूण रु. 106 कोटी 27 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तसेच परिवहन उपक्रमांत नव्याने खरेदी करण्यात येणा-या 50 मिडी बसेस पासून रु.4 कोटी 59 लक्ष, 100 इलेक्ट्रीक बसेसपासून रक्कम रु.4 कोटी 53 लक्ष, 200 मिडी बसेस पासून 9 कोटी 7 लक्ष असे परिवहन सेवेचे नवीन बसेससहीत एकूण रक्कम रु. 124 कोटी 46 लक्ष इतके प्रवासी उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

2) इतर मिळकती पासूनचे उत्पन्न :- तिकिट विक्री उत्पन्ना व्यतिरिक्त इतर मिळकतीपासून म्हणजे, बसेस वरील जाहिरात भाडयापोटी या वर्षी रु. 4 कोटी 34 लक्ष, विद्यार्थी पासेस पोटी रु.1 कोटी 25 लक्ष, निरुपयोगी वाहन वस्तू विक्रीपोटी रु. 5 कोटी 20 लक्ष, सवलतीपोटी अनुदान (दिव्यांग,जेष्ठनागरीक) करीता रु.18 कोटी 79 लक्ष पोलीस खात्याकडून प्रतिपूर्ती पोटी सन 2018-19 पासून प्रलंबित रु. 17 कोटी 22 लक्ष तसेच इतर किरकोळ उत्पन्न रु. 2 कोटी 22 लक्ष असे एकत्रित रु. 49 कोटी 2 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे. अशी अंदाजपत्रकातील एकूण महसुली जमा रक्कम रु. 173 कोटी 48 लक्ष इतकी अपेक्षित धरण्यात आली आहे.

महसुली खर्चाबाबत :-

1) वाहन दुरुस्ती व निगा :- बसेसच्या दुरुस्ती व निगा या करिता आवश्यक असलेले सुटेभाग टायर्स, वाहनांची बाहेरुन दुरुस्ती, टायर रिमोडींग, बॅटरीज, ऑटो इलेक्ट्रीकल सामान इत्यादीसाठी

रु. 13 कोटी 84 लक्ष इतकी तरतुद करण्यात आली आहे.

2) विधी विभागाकडील प्रलंबित विमा दावे : सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून परिवहन उपक्रमाच्या 94 बसेसचा तृतियपक्षी व 230 बसेसचा प्रथम पक्षी विमा काढण्यात आला असल्याने, सन 2021-22 या मुळ अंदाजपत्रकात विम्यापोटी व सन 2018-19 पूर्वीच्या अपघात दाव्यांपोटी रक्कम रु. 4 कोटी 86 लक्ष इतक्या रकमेची तरतूद केली असून, सदरचा खर्च ठाणे महापालिका महसुली अनुदानातून मागणी करण्यात येत आहे.

3) सेवा निवृत्ती निधीबाबत :- परिवहन सेवेकडील सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीवेतन योजना लागू आहे. आजमितीस एकूण 630 व सन 2021-22 या आर्थिक वर्षात 157 कर्मचारी निवृत्त होणार असून, एकूण 787 कर्मचा-यांना उपदान, रजावेतन व मासिक निवृत्तीवेतन असे सरासरी रु.1 कोटी 75 लक्ष पर्यंत अदा करावे लागणार आहे. सद्य: स्थितीत सेवानिवृत्ती प्रशासन हिस्सापोर्टी (1 प्रमाणे) दरमहा द्याव्या लागणा-या रकमेपेक्षा पेन्शन अदायगीची रक्कम रु.1 कोटी 50 लक्षांनी जास्त आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात निवृत्तीवेतन व उपदान अदायगीपोटी अंदाजपत्रकामध्ये एकूण रु. 21 कोटी 6 लक्ष रकमेची करण्यांत आलेल्या तरतूदी पैकी रु. 18 कोटी रकमेची महसुली अनुदानात मागणी करण्यांत आलेली आहे. या व्यतिरिक्त थकित उपदान व रजा वेतन करिता रक्कम रु.4 कोटी रकमेची तरतुद करणेत आली असून, सन 2021-22 मूळ अर्थसंकल्पात रु.4 कोटी रकमेची ठामपाकडे अनुदान स्वरुपात मागणी केली आहे.

4) डिझेल/सी.एन.जी.बाबत :- सन 2021-22 वर्षात आवश्यक असलेल्या डिझेल खरेदीकरिता एकूण रु. 43 कोटी 41 लक्ष रकमेची तरतुद करण्यात आली आहे. सी.एन.जी. पोटी वार्षिक रु. 4 कोटी 56 लक्ष इतकी रक्कम अदा करावी लागेल. सन 2021-22 च्या अंदाजपत्रकांत वंगणापोटी वार्षिक रु. 65 लक्ष असे एकत्रित रु. 48 कोटी 62 लक्ष इतक्या रकमेची तरतु करण्यांत आली आहे.


दृष्टीक्षेपांतील उत्पन्न वाढीबाबतचे स्त्रोत :

१. परिवहन सेवेच्या जागांवर होडींग्जला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

२. परिवहन सेवेच्या चौक्या जाहिरातीचे अधिकार देऊन विकसित करण्याचा प्रस्ताव

3. मान्यतेस्तव सादर करण्यांत आला आहे. अत्याधुनिक पध्दतीचे निवारे विकसित करणे. ३.

४. परिवहन सेवेच्या जागांमध्ये ए.टी.एम. सेंटरची उभारणी करुन उत्पन्नाचे स्त्रोत विकसित करणे.

५. परिवहन सेवेच्या बस आगारांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवून ऊर्जेमध्ये बचत करणे.

६. ७. परिवहन सेवेच्या बसमध्ये एल.ई.डी. स्क्रीन लावून जाहिराती व्दारे उत्पन्न वाढविणे. बस फे-या वाढविण्याबाबत उपाययोजना ठाणे शहरांतील विविध विकास कामे नियोजित वेळापत्रकानुसार कार्यान्वित करणेकरीता मोठया प्रमाणात रस्त्यावरील कामे सुरु आहेत. परिणामी बस फे-या रद्द होण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत ठाणे शहर वाहतुक नियंत्रणकक्ष यांजकडे समन्वय साधून वाहतुककोंडी सोडविणेबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. जेणे करुन यामुळे परिवहन सेवेच्या उत्पन्नात वाढ होईल.

८. आनंदनगर व कोलशेत आगारातील राखीव भूखंड बांधा वापरा व हस्तांतरीत करा (BOT) या तत्वावर विकसित करुन घेणे.

प्रवासी संख्या वाढविण्याची उपाययोजना:

१) ठाणे शहरामध्ये येणारा प्रवासी हा मुख्यत्वे रेल्वेने ठाणे स्टेशन येथे येऊन येथून इच्छीत स्थळी प्रवास करीत असतो. ठाणे सँंटीस येथून १०२ मार्गावर प्रवासी सेवा पुरविली जाते. सेंटीस येथे आलेल्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता मेगाफोनव्दारे' सोडण्यांत येणा-या वसेसवावतयी माहिती देण्यात येते. सॅटीस येथे प्रवाशांचा ओघ मोठया प्रमाणात असून, प्रवाश्यांना मार्गदर्शन करणेसाठी प्रवासी गर्दीच्या वेळेत पर्यवेक्षकीय कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येते.

२) ठाणे शहर अंतर्गत परिवहन सेवेचे विविध बस थांबे आहेत. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत या बस थाब्यांवर डिजिटल बस थांबे निर्माण करुन या डिजिटल धाब्यावर बस आगमणाची वेळ दर्शविण्यात येणार आहे. परिणामी परिवहन सेवेचे बसने प्रवास करणा-या प्रवाशाना बस आगमनाची निश्चित वेळ समजण्यास मदत होऊन त्याजोगे प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे.

३) प्रादेशिक परिवहन कार्यालय व ठाणे शहर वाहतुक नियंत्रण शाखा या कार्यालयाशों समन्वय साथून ठाणे शहरामध्ये अवैध रित्या वाहतुक करणा-या वाहनांवर आळा घालण्याकरीता प्रयत् करण्यांत येणार असून, त्याजोगे ठाणे परिवहन सेवेच्या प्रवाशी संख्येत वाढ करण्याचे नियोजन आहे. ४) ठाणे परिवहन सेवेच्या बस ताफ्यामध्ये जास्तीत-जास्त 'मिडी - मिनी' बसेस घेऊन ज्या मार्गावर बस

सेवा उपलब्ध नाही, असे मार्ग सेवा कक्षात आणून व अशा मार्गावर बस फे-यांचे नियोजन करुन

जास्तीत-जास्त प्रवासी परिवहन सेवेकडे आकर्षित करण्याचे नियोजन आहे.

५) ठाणेकर जनतेने खाजगी वाहनांचा वापर करणे ऐवजी, परिवहन उपक्रमाच्या बसेसचा वापर करण्याबाबत डिजिटल माध्यमांतून जनतेला आवाहन करता येईल. जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होऊन प्रदूषण ही कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Thane Transport budget of Rs. 458.13 crore submitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे