शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

ठाणे वाहतूक शाखेने १३ दिवसांमध्ये केली एक कोटी ३० लाखांची दंड वसूली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:41 IST

वाहतूकीचे नियम तोडल्यानंतर ई चलान दंडाची थकबाकी करणाऱ्या चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरु केली आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये एक कोटी ३१ लाखांच्या दंडाची वसूली झाली आहे. वाहन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत दंडाची रक्कम भरण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्दे ई चलानच्या थकीत दंड वसूलीची मोहीम तीव्र दररोज सुमारे १० लाखांची दंड वसूली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात ई चलान पद्धतीने कारवाई होते. अनेक वाहनचालक दंडाची रक्कम भरण्याचे टाळतात. अशा चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या १३ दिवसांमध्ये एक कोटी ३१ लाखांच्या दंडाची वसूली झाली आहे. वाहन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत दंडाची रक्कम भरण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे वाहतूक शाखा १८ उपविभागामार्फत ई चलान प्रक्रि या राबवित आहेत. फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नियम मोडणाºयांची सहा लाख ३० हजार २०४ प्रकरणे दाखल झाली. त्यांच्या दंडापोटी २१ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी होती. जानेवारी ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत चार लाख २३ हजार प्रकरणांमध्ये २५ कोटी ५ लाख रु पयांचा दंड ठोठावला आहे. कोरोना संक्र माणाच्या काळात दंड वसूलीचे प्रमाणही रोडावले आहे. वाहतूकीचा नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि त्यांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाईचे तसेच थकीत ई चलानच्या दंड वसुलीसाठी ठोस मोहिम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना दिले. याच पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून ही मोहीम वाहतूक शाखेने सुरु केली. दररोज सरासरी दहा लाख रु पयांचा दंड वसूल केला जात आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वत: थकीत दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.*आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भरण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.*अशा पद्धतीने भरा ई चलानचा दंडठाणे शहर वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली ५९अधिकारी आणि अंमलदारांकडे ई चलान मशिन आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही चलानची रक्कम रोख किंवा क्र ेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तिथे भरता येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस