Thane: टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
By अजित मांडके | Updated: December 17, 2024 21:55 IST2024-12-17T21:55:17+5:302024-12-17T21:55:42+5:30
Thane News: पगार वाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत सपांची हाक दिली होती. अखेर रात्री आठ वाजता टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला.

Thane: टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
ठाणे - पगार वाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत सपांची हाक दिली होती. अखेर रात्री आठ वाजता टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारात आता साडेचार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच दंडाची जी काही रक्कम होती त्यावर देखील तोडगा काढण्याची आश्वासन ठेकेदारामार्फत देण्यात आले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दर महिना बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल असेही सांगण्यात आले आहे.