मोफत बॅग न दिल्याने ठाण्यात दुकानदारासह तिघांना मारहाण: तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 19:29 IST2018-02-18T19:20:47+5:302018-02-18T19:29:23+5:30

ठाण्याच्या एका दुकानदाराने मोफत बॅग न दिल्याच्या रागातून मालकासह त्याच्या दोन नोकरांनाही जबर मारहाण करणा-या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

 Thane throws thieves with shopkeeper without giving free bag: Three arrested | मोफत बॅग न दिल्याने ठाण्यात दुकानदारासह तिघांना मारहाण: तिघांना अटक

तिघांना अटक

ठळक मुद्दे मद्य प्राशन करुन तिघांचा दुकानात धिंगाणानोकराकडे केली मोफत बॅगेची मागणी नोकरासह मालकालाही जबर मारहाण

ठाणे: मोफत बॅग न देणा-या विक्रेत्यास आणि त्याच्या मालकाला तसेच अन्य एका नोकराला जबर मारहाण करुन शिवीगाळ करणा-या रवी खरे, उमेश विश्वकर्मा आणि प्रविण जाधव उर्फ लाल्या जाधव (रा. कैलासनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या तिघांना श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
कैलासनगर येथे विजय ट्रेडर्स हे विजय पटेल यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रवि खरे हा आपल्या साथीदारांसह मद्य प्राशन करुन वसंत ट्रेडर्स या दुकानासमोर आला. तिघांनीही आपसात संगनमत करुन या दुकानातील विक्रेता शंभाक सिंग याच्याकडे मोफत एका बॅगेची मागणी केली. ती देण्यास त्याने स्पष्ट नकार दिल्याने त्यांनी सिंगला शिवीगाळ करुन मारहाण केली. हा प्रकार त्याने दुकानाचे मालक पटेल यांना कळविला. तेंव्हा पटेल यांनीही दुकानात धाव घेऊन त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही न जुमानता रवि, उमेश आणि प्रविण या तिघांनीही पटेल यांच्यासह शुभांक आणि अजित सिंग या नोकरांनाही जबर मारहाण करुन शिवीगाळ केली. प्रविण याने तर रस्त्यावरील वीट उचलून पटेल यांच्या कपाळावर मारुन त्यांना जखमी केले. तिघांनाही पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याच दरम्यान, त्यांची जामीनावर सुटका झाली.

 

Web Title:  Thane throws thieves with shopkeeper without giving free bag: Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.