शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Thane: तीन महिन्यांच्या नवजात मुलीची पाच लाखांमध्ये विक्री, आईसह नऊ जणांना मुंब्य्रातून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 25, 2024 00:23 IST

Thane News: अवघ्या ८४ दिवसांच्या नवजात बाळाची (मुलीची) पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या साहिल उर्फ सद्दाम हुसेन खान (३२, रा. मुंब्रा) या दलाल आणि मुलीच्या आईसह नऊ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी शुक्रवारी दिली.

- जितेंद्र कालेकर  ठाणे - अवघ्या ८४ दिवसांच्या नवजात बाळाची (मुलीची) पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या साहिल उर्फ सद्दाम हुसेन खान (३२, रा. मुंब्रा) या दलाल आणि मुलीच्या आईसह नऊ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी शुक्रवारी दिली. नाशिक येथून आणलेल्या या बाळाचीही आरोपींच्या तावडीतून सुटका केली आहे.

मुंब्रा येथे नवजात बाळाची बेकायदा विक्री होणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याचआधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले आणि उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या टोळीशी संपर्क केला होता. दरम्यान, या टोळीतील दोघा दलालांनी २२ मे रोजी बनावट ग्राहकाशी संपर्क साधून त्यांच्याकडे एक तीन महिन्यांची मुलगी विक्रीसाठी असल्याचे सांगितले. या बाळासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असेही दोघा दलालांनी बनावट ग्राहकाला सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने या टोळीस बाळ खरेदी करण्यास संमती दर्शवली. त्यानंतर २३ मे रोजी या टोळीतील सात जण बाळाला घेऊन नाशिकहून मुंब्य्रात आले. यावेळी पोलिसांनी पहाटे सहाच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर बस स्टॉप येथे सापळा लावून सहा जणांना अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली. या टोळीतील अन्य एकास त्याच दिवशी मुंब्य्रातून अटक केली.

या बाळाची आई आणि एका तृतीयपंथीयाला नाशिक येथून अटक केली. साहिल उर्फ सद्दाम याच्यासह साहिदा रफिक शेख (४०, अमृतनगर, मुंब्रा), खतीजा सद्दाम हुसेन खान (२७, मुंब्रा), प्रताप किशोरलाल केशवानी (२३, उल्हासनगर), मोना सुनील खेमाने (३०, टिटवाळा), सुनीता सर्जेराव बैसाने (३५, नाशिक), सर्जेराव बैसाने (नाशिक), शालू कैफ शेख (२५, नाशिक, बाळाची आई) आणि तृतीयपंथी राजू वाघमारे (३०, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीच्या ताब्यातून बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून, या बाळास विश्व बालक केंद्र, नेरूळ नवी मुंबई येथे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी