ठाण्यात राडा! शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले, तणावाचे वातावरण

By जितेंद्र कालेकर | Updated: November 15, 2022 06:06 IST2022-11-15T05:39:19+5:302022-11-15T06:06:23+5:30

Thane News: किसन नगर येथे संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल  शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे  गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाने ठाकरे गटातील उभ्या असलेल्या  कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

Thane: Shiv Sena's Thackeray and Shinde factions faced each other | ठाण्यात राडा! शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले, तणावाचे वातावरण

ठाण्यात राडा! शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले, तणावाचे वातावरण

- जितेंद्र कालेकर
ठाणे  - किसन नगर येथे संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल  शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे  गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाने ठाकरे गटातील उभ्या असलेल्या  कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. ठाकरे गटाकडून याठिकाणी  मेळावा घेण्यात येत होता.  यावेळी एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला  मारहाण झाल्याचा आरोप आहे. खासदार राजन विचारे हेही यावेळी  उपस्थित होते.


दोन्ही गटांचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात जमा झाले  होते. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध  गुन्हा दाखल करीत असल्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले.कोणतीही अनुचित घडू नये, यासाठी श्रीनगर पोलिस ठाण्यात   राज्य राखीव दलासह  पोलिस मुख्यालयातील जादा  कुमक तैनात केली  आहे.

Web Title: Thane: Shiv Sena's Thackeray and Shinde factions faced each other