ठाण्यात टपऱ्या, स्टॉलसह शेड तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:48 IST2021-09-08T04:48:51+5:302021-09-08T04:48:51+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेने मंगळवारी कळवा, कापूरबावडी, वागळे इस्टेट येथील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या, टपऱ्या, तसेच स्टॉल ...

ठाण्यात टपऱ्या, स्टॉलसह शेड तोडले
ठाणे : ठाणे महापालिकेने मंगळवारी कळवा, कापूरबावडी, वागळे इस्टेट येथील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या, टपऱ्या, तसेच स्टॉल तोडले.
कळवा स्टेशन रोड ते कळवा भाजी मार्केट, खारेगाव पारसिकनगर, टीएमटी बस डेपो परिसरातील पथ विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई केली. वागळेतील रोड नं. १६, किसननगर नं. १, २, ३ ते श्रीनगर, आयप्पा मंदिर परिसरात तीन हातगाड्या, ३२ पावसाळी शेड, सहा टपऱ्यांसह अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड तोडले, तसेच कॅडबरी जंक्शन ते आंबेडकर रोड, खोपट रोडवरील अनधिकृत फेरीवाले हटवून पाच हातगाड्या जप्त करून दुकानासमोरील वाढीव प्लास्टिक शेड निष्कासित केले. यासोबतच कापूरबावडी नाका ते कोलशेत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यांवर व पदपथावरील एक लोखंडी बाकडे, चार ताडपत्री शेड, पाच हातगाड्या, दोन पान टपऱ्या निष्कासित करून लोखंडी कपाट, जाळी काउंटर, शेगडी, दोन सिलिंडर, शोरमा मशीन जप्त केली, तसेच शीळ मुख्य रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, तसेच फुटपाथवरील सात हातगाड्या, तीन लाकडी टेबल व दोन लोखंडी स्टॉल जप्त करून तीन शेड तोडले.