Thane: शरद पवार समर्थक कार्यकर्ते वाय.बी. सेंटरला रवाना

By अजित मांडके | Updated: July 5, 2023 11:50 IST2023-07-05T11:49:26+5:302023-07-05T11:50:04+5:30

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी वाय. बी. सेंटरच्या दिशेने कूच केले.

Thane: Sharad Pawar pro-activist Y.B. Off to the center | Thane: शरद पवार समर्थक कार्यकर्ते वाय.बी. सेंटरला रवाना

Thane: शरद पवार समर्थक कार्यकर्ते वाय.बी. सेंटरला रवाना

- अजित मांडके 
ठाणे -  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी वाय. बी. सेंटरच्या दिशेने कूच केले. यावेळी कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मूळ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आदी भागातून सुमारे ९१ बसगाड्यांमधून हजारो महिला- पुरूष कार्यकर्ते रवाना झाले.

यावेळी कार्यकर्ते, "एकच नेता.. शरद पवार; एकच ध्यास .. शरद पवार; भारताचा बुलंद आवाज शरद पवार" आदी प्रकारच्या घोषणा देत होते.

Web Title: Thane: Sharad Pawar pro-activist Y.B. Off to the center