Thane: हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’, पोलिसाचा मुलगा जेरबंद, तीन तरुणींची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: March 22, 2024 21:20 IST2024-03-22T21:18:54+5:302024-03-22T21:20:18+5:30

Thane Crime News: ठाणे स्टेशन रोड परिसरात एका हॉटेलमध्ये काही तरुणींना पैशाचे प्रलोभन दाखवून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या अश्विन कदम (वय ३२, रा. सांताक्रूझ, मुंबई) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

Thane: 'Sex racket' in hotel, policeman's son jailed, three young women freed | Thane: हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’, पोलिसाचा मुलगा जेरबंद, तीन तरुणींची सुटका

Thane: हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’, पोलिसाचा मुलगा जेरबंद, तीन तरुणींची सुटका

- जितेंद्र कालेकर 
ठाणे - ठाणे स्टेशन रोड परिसरात एका हॉटेलमध्ये काही तरुणींना पैशाचे प्रलोभन दाखवून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या अश्विन कदम (वय ३२, रा. सांताक्रूझ, मुंबई) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याच्या तावडीतून तीन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. चौकशीत मुंबई पोलिस दलातील एका जमादाराचा अश्विन मुलगा असल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे पश्चिमेकडील स्टेशन रोड भागातील हॉटेल विश्वासमध्ये काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याआधारे २१ मार्चला दुपारी ३:५० च्या सुमारास ठाणे पश्चिमेकडील ठाकूर निवास बिल्डिंगमधील हॉटेलमध्ये सापळा रचून अश्विन कदम याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने लिविंग वॉटर मिशन या ठाण्यातील सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Thane: 'Sex racket' in hotel, policeman's son jailed, three young women freed