शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४५ फिर्यादींना हस्तांतरीत केला एक कोटी २५ लाखांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:00 IST

ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीणमधील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील रोकड आणि दागिन्यांसह सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी सेवापदके परत मिळाल्याने लष्कारातील माजी अधिकारीही भावूक झाला होता.

ठळक मुद्देचोरीतील सेवापदके परत मिळाल्याने लष्करातील अधिकारी झाला भावूक दागिनेही पुन्हा मिळाल्याने किन्हवलीची गृहिणीही भारावली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चोरी आणि जबरी चोरीतील एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा ऐवज ४५ फिर्यादींना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते मंगळवारी अभिहस्तांतरण करण्यात आला. जबरी चोरीतील पदके आणि दोन लाखांची रक्कम पोलिसांनी परत केल्यानंतर लष्कारातील माजी अधिकारी सनी थॉमस यांनी समाधान व्यक्त करतांनाच भावूक झाले होते.ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीण जिल्हयातील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील सोन्याचे दागिने (मंगळसूत्रे, सोनसाखळी, कर्णफुले, बे्रसलेट, कानाच्या रिंगा, झुमके आणि इतर ) तसेच चोरीस गेलेली मोटारसायकल, मोबाईल आणि रोकड असा सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.

यावेळी मौल्यवान मंगळसूत्रांसह मौल्यवान दागिने, मोबाईल, मोटारसायकली आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. अंबरनाथ येथील कुळगाव येथील रहिवाशी असेलेले सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट सनी थॉमस यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. थॉमस यांनी भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपली सेवा बजावल्याने त्यांना चांगल्या कामगिरीबद्दलची सेवा पदके मिळाली होती. त्यांच्याकडे झालेल्या या मौल्यवान पदकांसह दोन लाखांची रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अवघ्या चार दिवसात उघडकीस आणली होती. या प्रकरणात नवी मुंबईतून तिघा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील पदकांसह सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. आयुष्यात आपण काहीच कमावले नाही. पण निवृत्तीनंतर मिळालेली दोन लाखांची जमा पुंजी समाजकार्यासाठी उपयोगात आणायची होती. शिवाय भारत पाक सीमेमवर बजावलेल्या कर्तव्यापोटी केंद्र सरकारकडून मिळालेले पदक हीच एक मोठी संपत्ती होती. तीही चोरी झाली होती. ती पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक आंधळे यांच्या पथकाचा आपल्याला अभिमान आहे. पोलीस मेहनत घेऊन गुन्हा कसा उघडकीस आणतात याचा चांगला अनुभव आल्याचे सांगतांनाच त्यांना गहिवरुन आले. तसेच घरातील चोरीतून चोरटयांनी आयुष्यभराची कमाई चोरुन नेली होती. पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा सर्व साडे चार तोळयांचा ८८ हजारांचा ऐवज परत मिळवून दिल्याचे किन्हवली येथील वैशाली देशमुख यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. देशमुख यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. तिचा किन्हवली पोलिसांनी यशस्वी तपास केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक नाईक, मीरा रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी, पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

नोकरांना काम देतांना काळजी घ्या- डॉ. राठोडआपल्या मालमत्तेची कशा प्रकारे सुरक्षा घ्यायची याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही तसेच अनोळखी व्यक्तीला कोणतेही काम देतांना किंवा नोकरीवर ठेवतांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी बाहेरगावी जातांना आपल्या घराची कशा प्रकारे सुरक्षा घ्यावयाची याबाबत अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस